पाणी गढूळ मात्र पिण्यास योग्य 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 ऑगस्ट 2017

नागपूर - काही दिवसांपासून उत्तर, पूर्ण आणि दक्षिण नागपूरमध्ये नळाद्वारे गढूळ  पाण्याचा पुरवठा होत आहे. कन्हान नदीमध्ये जैविक वाढ झाली असल्याने पाणी किंचित गढूळ दिसत आहे. यामुळे घाबरण्याचे कारण नाहीऋ पाणी गढूळ दिसत असले तरी ते पिण्यासाठी योग्य असल्याचा दावा महापालिकेच्या ऑरेंज सिटी वॉटर कंपनीने केला आहे.

यावर्षी फराच कमी पाऊस पडला. कन्हान नदी मोठ्या प्रमाणात कोरडी आहे. कोरड्या जागेवर वनस्पती वाढली आहे. यामुळे कच्च्या पाण्याची गुणवत्ता बदलली आहे. पाण्याचा रंग हिरवट झालेला आहे. कच्च्या पाण्यात जैविक वाढ झाली असल्याने पाण्याचा रंग थोडा हिरवा होतो असे नीरीच्या जलतज्ज्ञांचे मत आहे. त्यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार शुद्धीकरण केल्या जात आहे. याकरिता कन्हान नदीच्या कच्या पाण्यात क्‍लोरीनेशनचे प्रमाण वाढविण्यात आले आहे. काही भागांमध्ये ब्‍लिचिंग पावडर टाकल्या जात आहे. फिल्टर बेड्‌सचे सातत्याने बॅकवॉश केले जात आहे. तसेच १७ ऑगस्टला नीरीचे तज्ज्ञ पाण्याचे नमुने तपासणार आहेत. यानंतर आणखी नव्या उपाययोजना केल्या जातील, अशी माहिती ओसीडब्ल्यूने दिली आहे.

Web Title: nagpur news water

टॅग्स