`नांमका'च्या पाण्यासाठी उपअभियंत्याला घेराव

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 ऑगस्ट 2019

वरील भागात पाणी वळविले जात असल्याने तालुक्‍यातील अखेरच्या भागापर्यंत पाणी येत नाही. अधिकारी कामच करत नसल्याने लाभधारक शेतकऱ्यांनी उपअभियंता व्ही. एम. टेहळे यांना घेराव घालून जाब विचारला.

गंगापूर, ता. 11 (बातमीदार) : वरील भागात पाणी वळविले जात असल्याने तालुक्‍यातील अखेरच्या भागापर्यंत पाणी येत नाही. अधिकारी कामच करत नसल्याने लाभधारक शेतकऱ्यांनी उपअभियंता व्ही. एम. टेहळे यांना घेराव घालून जाब विचारला.

नगरसेवक प्रदीप पाटील व नगरसेवक विजय पानकडे यांनी गंगापूर तालुक्‍यातील सर्वच पाझर तलाव भरून द्यावेत, अशी मागणी केली. पाच दिवसांपासून नामकाचे पाणी तालुक्‍यात दाखल झाले आहे. मात्र, वरील भागातील अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून पैसे घेऊन ठिकठिकाणी पाणी वळविले आहे. त्यामुळे वरखेड (ता. गंगापूर) येथील एक्‍स्प्रेस कालव्याला पाण्याला जेवढी उंची हवी तेवढी उंची नाही. पाण्याला वेगही नसल्याने पुढील भागात पाणीच जात नसल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे. नाशिक जिल्ह्यात चांगला पाऊस झाल्याने गोदावरी नदीत विसर्ग सुरू आहे. हे पाणी दुष्काळी गंगापूर व वैजापूर तालुक्‍यासाठी देखील सोडण्यात आले आहे. दोन्ही तालुक्‍यांत पाऊस नसल्याने अनेक शेतकऱ्यांना नांमकाचे पाणी आधार ठरणार आहे.

मात्र, गंगापूरच्या अधिकाऱ्यांच्या बेजबाबदार भूमिकेमुळे पाणी अखेरच्या भागापर्यंत पोचलेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा रोष मोठ्या प्रमाणात वाढला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी उपअभियंत्यांना घेराव घालून जाब विचारला. यावेळस नगरसेवक प्रदीप पाटील, विजय पानकडे, राजू पवार, अनिल पानकडे यांच्यासह लाभधारक शेतकऱ्यांची उपस्थिती होती.

वरील भागात होत असलेली पाणी चोरी रोखण्यासाठी चारीवर जाणार आहे. तसेच, नाशिक जिल्ह्यातून विसर्ग सुरू आहे, तोवर गंगापूर तालुक्‍यातील सर्वच पाझर तलाव भरून घेण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
- व्ही. एम. टेहळे, उपअभियंता, नांमका.  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: For Namka Water Ghero to Dupty Engineer