नांदेडमध्ये दलालासह बॅंकेच्या कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांनी कोंडले

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 जुलै 2017

नांदेडः तामसा येथील जिल्हा मध्यवर्ती बॅंकेमध्ये अनुदान वाटपास दलालांच्या मुक्त वावरामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आज (शनिवार) दलालासह जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या नांदेड येथील मुख्य कार्यालयातील सामान्य व्यवस्थापक एम.एम.चव्हाण हे तामसात दाखल होवून शाखा व्यवस्थापक दिलीप धोबे यांच्या विरुद्ध कार्यवाहीचे लेखी आश्‍वासन मिळाल्यानंतर बॅंकेचे कुलूप काढण्यात आले. कुलूप काढताच अडकलेल्या दलालांनी बॅंकेबाहेर धुम ठोकत पळ काढला.

नांदेडः तामसा येथील जिल्हा मध्यवर्ती बॅंकेमध्ये अनुदान वाटपास दलालांच्या मुक्त वावरामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आज (शनिवार) दलालासह जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या नांदेड येथील मुख्य कार्यालयातील सामान्य व्यवस्थापक एम.एम.चव्हाण हे तामसात दाखल होवून शाखा व्यवस्थापक दिलीप धोबे यांच्या विरुद्ध कार्यवाहीचे लेखी आश्‍वासन मिळाल्यानंतर बॅंकेचे कुलूप काढण्यात आले. कुलूप काढताच अडकलेल्या दलालांनी बॅंकेबाहेर धुम ठोकत पळ काढला.

येथील मध्यवर्ती बॅंक शाखेत मागील पंधरवाड्यापासून विविध प्रकारचे अनुदान शेतकऱ्यांना वाटप करण्यासाठी प्राप्त झाले. पण शाखा व्यवस्थापक धोबे यांनी सुरवातीपासूनच दलालांना वितरण कारभारात मोकळीक दिल्यामुळे दलालांची संख्या तीसीत गेल्याचे समजते. बॅंकेतून या दलालांनी स्लीपा प्राप्त करुन शंभर ते ३०० रुपयांनी स्लीप शेतकऱ्यांना विकणे चालविले. विकलेली स्लीप संबंधित दलालाकडून भरुन घेण्याची सक्तीच असल्याचे आरोप होते. शेतकरी मोठ्या संख्येने बॅंकेत अनुदानासाठी खेटे घालत असतानाही बॅंकेतून अनुदान मिळत नव्हते. बॅंकेत शेतकरी सकाळी जात असताना बॅंकेला कुलूप लावले लात नव्हते. पंधरा दिवसांपासून शेतकऱ्यांना बॅंकेत प्रवेशच नाकारला जात होता. पण दलाल मात्र विनाव्यत्यय कुलूप खोलून बॅंकेत प्रवेश करुन एकदाच मोठ्या संख्येने शेतकऱ्यांच्या स्लीप देवून अनुदान उचलत होते. दलालाच्या गटातील व खिशातील नोटांची बंडले बघून बॅंकेसमोर रोज गोंधळ व शिवीगाळ होत असायची. पण बॅंकेच्या व्यवस्थापकावर त्याचा काहीही परिणाम होत नव्हता. यामुळे शेतकरी मनातल्या मनात खदखदत होता. शतकऱ्यांच्या स्लीप गायब करुन त्यांना नाहक परेशान केले जात होते.

या प्रकारामुळे शेतकरी संतप्त होता. दलालांनी बॅंकेच्या व्यवस्थापकाला विश्‍वासात घेवून बॅंकेला वेठीस धरल्याचे चित्र येथे बघायला मिळत होते. दलालांची आरेरावी वाढून त्यांनी शेतकऱ्यांना अपमानस्पद वागणूक देण्यास सुरू केले. दलालांनी व्यवस्थाापकांना त्यांच्या सरसम गावापासून येथे आणून बॅंक सुटल्यानंतर गावापर्यंत पोचण्यासाठीची राेज व्यवस्था केली होती असे येथील शेतकरी सांगतात. शेतकऱ्यांना दिवसभर बॅंकेसमोर उभे रहावयास सांगायचे पण अनुदान मिळत नव्हते. शेतकऱ्यांना स्लीप सोबत आधार पत्राची सत्यप्रत मागितली जात असे. पण दलालाकडून अनुदान शंभर शेतकऱ्यांच्या नावाची यादी व स्लीप आधार पत्राशिवाय पात्र होवनू बिना त्रासाचे अनुदान रक्कम दिली जायची.

बॅंकेतील अनागोंदी व दलालीचा कळस होण्यामुळे अखेर शनिवारी शेतकरी कमालीचे आक्रमक झाले. संतप्त शेतकऱ्यांनी बॅंक सुरू होताच बॅंकेला कुलूप ठाेकले. या वेळी बॅंकेत दोन कर्मचारी व काही दलाल होते. शेतकऱ्यांच्या आक्रमक पावित्रयामुळे अधिकारी घाबरले. या वेळी बॅंकेचे अध्यक्ष व कार्यकारी व्यवस्थापक यांच्या कारभाराचा तीव्र शब्दांमध्ये निषेध करण्यात आला. भाजपचे माजी शहराध्यक्ष दीपक देशमुख यांनी बॅंकेच्या नांदेड कार्यालयाशी संपर्क करुन येथील भ्रष्टाचाराची माहिती देवून कुलूप ठोकण्याची कृती कळविली. बॅंकेच्या मुख्य कार्यालयाने ताबडतोब सामान्य व्यवस्थापक एम.एम.चव्हाण यांना येथे पाचारण केले. चव्हाण यांनी संतप्त शेतकऱ्यांशी चर्चा करुन कुलूप खोलण्याची विनंती केली. शाखा व्यवस्थाापक धोबे यांच्या विरुद्घ कार्यवाही करुन दलालांच्या व्यवहाराची माहिती घेण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर कुलूप खोलण्यात आले. घटनास्थळी पोलिस उपनिरिक्षक सचिन येवले हे पोलिसांसह दाखल झाले होते. पोलिसांनी देखील व्यवस्थापकाच्या ढिसाळ कारभारावर खंत व्यक्त केली.

या वेळी दीपक देशमुख म्हणाले जर सोमवारपर्यंत शाखा व्यवस्थाापक व दलालांविरुद्ध कार्यवाही न झाल्यास पुन्हा बॅंकेला कुलूप ठोकण्यात येईल. बॅंकेच्या कारभारात थेट हस्तक्षेप करणाऱ्या विशिष्ट पक्षी दस्ती परिधान करणाऱ्या दलालांचा बंदोबस्त करण्याची कार्यवाही होणे आवश्‍यक आहे. या घटनांवर शाखा व्यवस्थाापक धोबे म्हणाले, की बॅंकेत माझ्यासह इतर एकच कर्मचारी असून दोघां कर्मचाऱ्यांवरच बॅंक चालविणे मुश्‍किल आहे. या परिस्थितीबाबत वरिष्ठांना कळविण्यात आले होते पण वरिष्ठांकडून कर्मचारी वाढवून दिले नाहीत. दलालांबाबत त्यांनी बोलणे टाळले.

ई सकाळवरील ताज्या बताम्यांसाठी क्लिक करा :

Web Title: nande news The farmers of the bank were forced to do so