अखिल महाराष्ट्र मुख्याध्यापक संघाचे 58  वे अधिवेशन नांदेडला

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 11 नोव्हेंबर 2018

अखिल महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व मुख्याध्यापक संयुक्त महामंडळाचे राज्यस्तरीय अधिवेशन गुरुवार तारीख 15 ते शनिवार तारीख 17 पर्यंत नांदेड येथे आयोजित केले आहे.

आर्वी (वर्धा) - अखिल महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व मुख्याध्यापक संयुक्त महामंडळाचे राज्यस्तरीय अधिवेशन गुरुवार तारीख 15 ते शनिवार तारीख 17 पर्यंत नांदेड येथे आयोजित केले आहे.

या अधिवेशनाला जिल्ह्यातील सर्व मुख्याध्यापक प्राचार्य यांनी उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाने केले आहे हे तीन दिवसीय अधिवेशन साहेब जादा  बाबा फतेह सिंगजी मंगल कार्यालय अबचल नगर भगतसिंग रोड गुरुद्वारा परिसर नांदेड येथे होणार आहे. 

या तीन दिवसीय अधिवेशन संमेलनाच्या अध्यक्षस्थानी वसंत पाटील राहणार आहे अधिवेशनाचे उद्घाटन शालेय शिक्षण व क्रीडा मंत्री विनोद तावडे करतील अध्यक्षस्थानी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण राहतील अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार पालक मंत्री रामदास कदम जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शांताबाई जवळगावकर स्वागताध्यक्ष माजी राज्यमंत्री श्री डी पी सावंत खासदार राजीव सातव खासदार डॉ. सुनील गायकवाड आमदार सतीश चव्हाण आमदार विक्रम काळे आदी अनेक आमदार खासदार जिल्हा परिषद पदाधिकारी उपस्थित राहणार आहे.

शुक्रवारी तारीख 16 दिल्लीचे उपमुख्य मंत्री मनीष सिसोदिया माजी शिक्षणमंत्री वसंत पुरके आमदार नागो गाणार शिक्षक संचालक गंगाधर म्हमान, सुनील चव्हाण, आमदार विक्रम काळे, आमदार कपिल पाटील, दत्तात्रय जगताप, एडवोकेट अपर्णा रामतीर्थकर, गोविंद नांदेडे, प्रसिद्ध विधिज्ञ एडवोकेट उज्वल निकम, महेश करजगावकर, बाळासाहेब कुंडगीर, प्रशांत दिग्रसकर, संघाचे संस्थापक अध्यक्ष रावसाहेब आवारी, आबासाहेब जंगले मारुती खेडेकर गोविंद नंदकुमार उपस्थिती राहणार आहे.

या तिनदिवसीय अधिवेशनात उपस्थित राहण्याचे आवाहन विदर्भ सचिव व जिल्हाध्यक्ष सतीश जगताप सचिव मनोहर बारस्कर मिलिंद मुळे कोषाध्यक्ष प्रदीप गोमासे उपाध्यक्ष शालिनीताई वाळके सहसचिव अनिल बाळसराफ प्रसिद्धी प्रमुख राजेश सोळंकी रवींद्र गोळे किशोर सोनटक्के अनिल बालसराफ संजय नांदे राजेंद्र येवले विजय चौधरी किशोर मढगे आणि सर्व जिल्हा पदाधिकारी यांनी केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded 58th Convention of All Maharashtra Headmaster's Association