नांदेड - बंदोबस्तावरील पोलिसांना टिफीनचे वाटप 

nanded
nanded

नांदेड - गणेश विसर्जनाच्या दिवशी बंदोबस्त कामी असलेल्या पोलिस अधिकारी, कर्मचारी, गृहरक्षक दल आणि पोलिस मित्रांना जेवनाचे टिफीन वाटप करण्यात आले. हा उपक्रम राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या वतीने घेण्यात आला.  

गणेशोत्सव बंदोबस्तसाठी तैणात असलेल्या पोलिसांची बाजू व त्यांचे म्हणणे कोणीच एेकूण घेत नाही. त्यांना नेमुन दिलेले कर्तव्य प्रामाणीकपणे करावे लागतात. परंतु समाजात पोलिसांच्या भावना ओळखणारी मंडळी आहे. पोलिसांना बंदोबस्तसाठी घरातून अवेळी बाहेर पडावे लागते. त्यानंतर त्यांना जेवायला घरी जाणे अशक्य असते. त्यांच्या विश्वासावरच लहानमुल, महिला, अबलावृध्द घराबाहेर पडून आपला आनंद साजरा करतात. त्यासाठी पोलिसांना राष्ट्रीय बंजारा परिषदेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. मोहन चव्हाण यांनी टिफीन बॉक्स वाट केले. पोलिस अधिक्षक संजय जाधव यांच्या हस्ते अधिकारी, कर्मचारी, पोलिस मित्र, स्वयंसेवक आणि होमगार्ड यांना या टिफीनचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रा. एन. जी. राठोड, शिवाजी गिरी, प्रविण चव्हाण, राहूल राठोड, विठ्ठल चव्हाण, विकास चव्हाण आणि सुरज गिरी यांच्यासह आदींची उपस्थिती होती. या उपक्रमाचे सर्वत्र कौतूक करण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com