दोन बांगलादेशीच्या चौकशीसाठी नांदेड एटीएसचे पथक लातुरात

हरी तुगावकर
रविवार, 8 जुलै 2018

बेकायदेशीररीत्या घुसखोरी करून भारतात येवून गेले तीन दिवस येथे वास्तव्यास असलेल्या दोन बांगलादेशींना शनिवारी (ता. 7) रात्री येथील पोलिसांनी अटक केली होती. त्यांच्याजवळून बांगलादेशाचे चलन, बनावट आधारकार्ड, पॅनकार्डही जप्त करण्यात आले आहे. या बांगलादेशींची चौकशी करण्यासाठी नांदेड येथील दहशतवाद विरोधी पथक रविवारी (ता. 8) येथे दाखल झाले आहे.

लातूर- बेकायदेशीररीत्या घुसखोरी करून भारतात येवून गेले तीन दिवस येथे वास्तव्यास असलेल्या दोन बांगलादेशींना शनिवारी (ता. 7) रात्री येथील पोलिसांनी अटक केली होती. त्यांच्याजवळून बांगलादेशाचे चलन, बनावट आधारकार्ड, पॅनकार्डही जप्त करण्यात आले आहे. या बांगलादेशींची चौकशी करण्यासाठी नांदेड येथील दहशतवाद विरोधी पथक रविवारी (ता. 8) येथे दाखल झाले आहे.
 

दोघांचा दहशतवाद्यांशी काही संबंध आहे का याचा तपास करण्यात येत आहे. येथून जवळच असलेल्या एका गावात एक तरुणी राहत आहे. या तरुणीच्या फेसबुकवर काही पोस्ट आल्या. या पोस्टच्या माध्यमातून एका तरुणाची ओळख झाली. यातून त्यांचा संपर्कही वाढला. या तरुणाने आपले नाव कबीर शेख रेजवाल शेख (वय 26) असून आपण मुंबईत राहत असल्याचे या तरुणीला त्याने सांगितले.  दोघांनी लग्न करण्याचा निर्णयही घेतला होता.

कबीर शेख व मोहमद दिनार हे दोघे तीन दिवसापूर्वी येथे आले. तीन दिवस ते येथे राहिले. त्यानंतर या तरुणीसोबत लग्न करून ते तीला घेवून जाण्याची शक्यता होती. याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी या दोन्ही तरुणांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता त्या दोघांनीही बेकायदेशीररीत्या भारतात घुसखोरी केल्याचे पोलिस तपासात पुढे आले. अधिक चौकशी केली असता त्यांच्याकडे बांगलादेशाचे चलन आढळून आले आहे.

तसेच, भारतात त्यांनी काढलेले आधारकार्ड व पॅनकार्डही पोलिसांनी जप्त केले
आहे. या दोघांची चौकशी करण्यासाठी रविवारी(ता. 8) नांदेड येथील दहशवाद
विरोधी पथक येथे दाखल झाले आहे. या दोघांचा दहशतवाद्यांशी काही संबंध आहे
का ते मुली विक्रीचा व्यवसाय करतात याची चौकशी केली जात आहे.

Web Title: Nanded ATS team detained for two Bangladeshi in investigation