नांदेड: उपसचिव अविनाश धोंडगे यांना अटक आणि सुटका 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 9 जून 2018

नांदेड येथे कार्यकारी अभियंता पदावर कार्यरत असताना अविनाश धोंडगे यांनी बनावट शिफारसपत्राच्या आधारावर नियमबाह्यरीत्या २७ जानेवारी २०१० रोजी ३० लाख रुपये किंमतीच्या सात कामांचे करारनामे करुन शासनाची फसवणुक केली होती. ही बाब माहिती अधिकार तपास समितीचे दत्ता शेंबाळे यानी निदर्शनास आणुन दिली होती.

नांंदेड : येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे तत्कालीन कार्यकारी अभियंता व सध्या मंत्रालयात उपसचिव म्हणुन कार्यरत असलेले अविनाश धोंडगे यांना अटक सात जून रोजी करण्यात आली होती. त्यांच्यावर बनावट शिफारसपत्र देवून नियमबाह्यरीत्या मजुर सहकारी संस्थेला कामे देवुन फसवणुक केल्याचा ठपका होता. न्यायालयाने त्यांची जामिनावर सुटका केली. 

नांदेड येथे कार्यकारी अभियंता पदावर कार्यरत असताना अविनाश धोंडगे यांनी बनावट शिफारसपत्राच्या आधारावर नियमबाह्यरीत्या २७ जानेवारी २०१० रोजी ३० लाख रुपये किंमतीच्या सात कामांचे करारनामे करुन शासनाची फसवणुक केली होती. ही बाब माहिती अधिकार तपास समितीचे दत्ता शेंबाळे यानी निदर्शनास आणुन दिली होती. परंतु त्यावर कोणतीही कार्यवाही होत नसल्याने सबळ पुराव्यासह त्यांनी न्यायालयात दाद मागितली असता न्यायालयाच्या आदेशाने अविनाश धोंडगे यांच्यासह १४ जणांविरुद्ध शिवाजीनगर पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. यावर आरोपींनी वेळोवेळी न्यायालयात अटकपुर्व जामिनासाठी प्रयत्न केले. त्यानंतर २०१३ मध्ये त्यांना अंतरीम जामीन मिळाला. परंतु ते न्यायालयात व ठाण्यात हजर होत नव्हते. पोलिसांच्या अनेक स्मरणपत्रानंतर श्री. धोंडगे सात जून रोजी शिवाजीनगर ठाण्यात हजर झाले. त्यांना पोलीस निरीक्षक साहेबराव नरवाडे यांनी अटक करुन तात्पुरत्या जामिनावर सुटका केली. 

Web Title: nanded avinash dhondge arrested