nanded bangalore express bogie fire
nanded bangalore express bogie firesakal

Railway Bogie Fire : नांदेड-बेंगलोर एक्सप्रेसच्या डब्याला लागली आग

नांदेड-बेंगलोर एक्सप्रेस ही रेल्वे गाडी रेल्वे स्थानकात दाखल झाली अचानक एका डब्या खालून मोठ्या प्रमाणावर धूर येत असल्याचे प्रवाशांच्या लक्षात आले.

उदगीर (जि. लातुर) - नांदेड-बेंगलोर एक्सप्रेस रेल्वेच्या गाडी नंबर १६५९४ कोच नंबर एस टु एस डब्लु २०१८६३/सी डब्याला मंगळवारी (ता.२८) सकाळी अकराच्या सुमारास आग लागल्याचे लक्षात आल्याने उदगीर रेल्वे स्थानकावर ही आग तात्काळ विझवण्यात आली. रेल्वेच्या दुरुस्ती विभागाच्या इंजिनिअरला बोलावून आग लागलेल्या डब्याची पाहणी करून दुरुस्त करून ही रेल्वे पुन्हा बेंगलोरकडे तैनात करण्यात आली.

मंगळवारी नांदेड बेंगलोर एक्सप्रेस ही रेल्वे गाडी रेल्वे स्थानकात दाखल झाली अचानक एका डब्या खालून मोठ्या प्रमाणावर धूर येत असल्याचे प्रवाशांच्या लक्षात आले. काही वेळ धावपळ झाली त्यानंतर ब्रेक सॉकेट जवळ आग लागल्याचे दिसून आले. रेल्वेच्या लोकोपायलट व अन्य कर्मचाऱ्यांच्या वतीने तात्काळ आगरोधक अग्निशामक यंत्राच्या साहाय्याने ही आग विझवण्यात आली.

नांदेड बेंगलोर ही रेल्वे गाडीला लागलेली आग वेळीच लक्षात आल्याने होणारी मोठी दुर्घटना टळली आहे.यानंतर तात्काळ परळीहून संबंधित विभागाच्या इजिनिअरला बोलावण्यात आले. रेल्वे कोचच्या ब्रेक पॅड घासल्याने ही आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. रेल्वेच्या चाकाला पकडलेला ब्रेक हा रेल्वे चालू झाल्यानंतर सुटला पाहिजे परंतु हा अडकून बसल्याने सतत घर्षण होऊन ही आग लागली असावी असा अंदाज रेल्वे प्रशासनाने व्यक्त केला आहे.

याबाबत उदगीर रेल्वे स्थानकाचे स्टेशन मास्टर राजू कुमार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की ब्रेक पॅड फसल्याने नांदेड बेंगलोर एक्सप्रेस गाडीच्या कोचला आग लागण्याची घटना घडली असे किरकोळ प्रकार नेहमी घडत असतात हा मेंटेनन्सचा भाग आहे.असे प्रकार होऊ नयेत म्हणून आम्ही सातत्याने काळजी घेत असतो.

महिन्यातील हा दुसरा प्रकार....

नांदेड बेंगलोर एक्सप्रेस रेल्वे गाडीच्या कोचला आग लागण्याची ही महिन्यातील दुसरी घटना आहे.एका महिन्यात दोन वेळा अशी घटना घडल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. या रेल्वे कोचचे मेंटेनन्स वेळेवर व व्यवस्थित होते की नाही? असा प्रश्न प्रवाशांना पडला आहे. या घटनेनंतर रेल्वे विभाग अलर्ट झाला रेल्वे प्रशासनाने हा विषय गांभीर्याने घेतला आहे. उच्चस्तरीय अधिकाऱ्यांच्या बैठकांचे सत्र सुरू झाले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com