नांदेड उत्तरमधील बसपचे उमेदवार किडनॅप

Nanded BSP Candidate kidnapped today
Nanded BSP Candidate kidnapped today

नांदेड : नांदेड (उत्तर) विधानसभा मतदार संघाच्या निवडणूक रिंगणात असलेले बहुजन समाज पक्षाचे (बसप) उमेदवार डॉ. प्रकाश बगाटे यांचे अज्ञातांनी सोमवारी (ता. 14) सकाळी 11 वाजता अपहरण केले. यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी भाग्यनगर पोलिस ठाण्यात मंगळवारी (ता. 15) पहाटे एकच्या सुमारास गुन्हा दाखल झाला. 

नांदेड उत्तर विधानसभा निवढणूकीसाठी बहुजन समाज पक्षाचे उमेदवार डॉ. प्रकाश गोविंदराव बगाटे हे नेहमीप्रमाणे सकाळी प्रचारासाठी घराबाहेर पडले. या मतदार संघात त्यांना वाढता प्रतिसाद लक्षात घेता विरोधकांनी त्यांचे अपहरण केल्याचा आरोप नातेवाईक व पक्षाच्या वतीने करण्यात आला. सोमवारी (ता. 14) सकाळी 11 वाजल्यापासून ते अचानक बेपत्ता झाले. त्यांचा शहरभर व मित्र- मंडळीकडे शोध घेतला परंतु ते सापडले नाही.

अपहरण केलेल्या उमेदवाराचा तात्काळ शोध लावून निवडणुक निकाल जाहीर होईपर्यंत त्यांना सुरक्षा द्यावी, तसेच नांदेड उत्तर विधानसभेची निवडणुक रद्द करावी अशी मागणी बसपच्या वतीने जिल्हाधिकारी तथा नृजिल्हा निवणूक अधिकारी यांच्याकडे एका शिष्टमंडळाने निवेदनाद्वारे केली आहे. या अपहरणप्रकरणी बबीता बालाजी पाईकराव यांच्या फिर्यादीवरुन भाग्यनगर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरूध्द अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस निरीक्षक अनिरूध्द काकडे करित आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com