नांदेड जिल्हाधिकारी यांच्या हस्ते पन्नास हजार ‘सीड’बॉलची लागवड

 शिवचरन वावळे  
गुरुवार, 5 जुलै 2018

सोनखेड सर्कल मधील कलंबर गावाच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थी, महिला बचतगट, सामाजिक संघटना, पाणी फाउंडेशन, व जैन संघटनेच्या वतीने दोन दिवसात पन्नास हजार ‘सीड’ बॉल तयार करण्यात आले होते.

नांदेड - शहरापासून जवळच असलेल्या कलंबर गावात पाणी फाऊंडेशन व जैन संघटनेच्या पुढाकारातून जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या हस्ते पन्नास हजार ‘सीड’ बॉलची लागवड करण्यात आली.

सोनखेड सर्कल मधील कलंबर गावाच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थी, महिला बचतगट, सामाजिक संघटना, पाणी फाउंडेशन, व जैन संघटनेच्या वतीने दोन दिवसात पन्नास हजार ‘सीड’ बॉल तयार करण्यात आले होते. गुरुवारी (ता. 5) जिल्हाधिकारी यांच्या हस्ते डोंगरावर छोट्या आकाराचे दांड तयार करुन माती आणि शेणखत मिश्रित आवळा, चिंच, बांबु, धावडा, खैर, बेरडा, हिरडा सारख्या माळरानावर कमी पाण्यात तग धरुन राहतील, अशा झाडांचे बियाणे लावण्यात आले.

शासनाच्या वृक्ष लागवडी नंतर ‘सीड’ बॉल लागवड हा महाराष्ट्रातील पहिलाच प्रयोग असल्याचे मानले जात अाहे. त्यामुळे जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी या उपक्रमाचे तौंडभरुन कौतुक केले. व कलंबर जिल्ह्यातील सर्वात पहिलाच ‘सीड’ बॉल प्रयोग असून, जिल्हाभरात हा प्रयोग गाबविण्यात येणार असल्याचे जाहिर केले. व माझ्या कल्पनेत अशाच पद्धतीचा ‘सीड’ बॉल प्रयोग होता. तो कलंबर वासियांनी या अत्यंत महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या सीड बॉल प्रयोगात अमुल्य असे योगदान दिले असून, यासाठी हवी ती मदत करण्याचा शासनाचा प्रयत्न असेल. सीड बॉल तयार करण्यासाठी गावकऱ्यांनी व सामाजिक संस्थांनी पुढे येणाची गरज असल्याचे त्यांनी नमुद केले. 
 
यावेळी उपवनसंरक्षक अधिकारी आशिष ठाकरे, अप्पर  जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा परिषदेचे सदस्य प्रवीण पाटील चिखलीकर, जैन संघटनेचे हर्षद शहा, राजीव जैन, दिपक मोरताळे, प्रेमकुमार फेरवाणी, बाळासाहेब शेंबोलिकर, ॲड. उदय संगारेड्डीकर, किरण मामिडवार, डॉ. भरत जेठवाणी, डॉ. परमेश्वर पौळ, तालुका कृषीधिकारी श्री मंगनाळे यांची उपस्थिती होती.
 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Nanded Collector planted fifty thousand seed balls