नांदेडमध्ये काँग्रेसने जाळला दानवेंचा पुतळा

प्रल्हाद कांबळे
शुक्रवार, 12 मे 2017

नांदेड: शेतकऱ्याच्या प्रश्नावर असंवेदनशील वक्तव्य करून आधीच त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणाऱ्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा निषेध करून काँग्रेस कार्यकर्त्यांनी तरोडा नाका शेतकरी चौकात पुतळा जाळला.

काँग्रेसचे महानगर अध्यक्ष आ अमरनाथ राजूरकर, नांदेड उत्तरचे आमदार तथा माजी मंत्री डी. पी. सावंत, आ. वसंतराव चव्हाण, गोविंदराव शिंदे नागेलीकर, महापौर शैलजा स्वामी, माजी आ. माधवराव पाटील जवळगावकर, प्रा किशनराव किनवटकर, किशोर स्वामी, विठल पावडे, संतोष पांडागळे, पप्पू पाटील कोंढेकर, खानापूरकर, संतोष मुळे इत्यादींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: nanded: congress burned danwe's statue