नांदेडमधील न्यायालय इमारतींना मिळणार अग्निशमनचे कवच !

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 जुलै 2018

नांदेड : जिल्हा व सत्र न्यायालय व त्यांच्या नियंत्रणांखालील इमारती तसेच मुखेड, कंधार, भोकर, बिलोली, किनवट, हदगाव, देगलूर, लोहा, नायगाव, माहूर, उमरी, धर्माबाद, हिमायतनगर आणि अर्धापूर या न्यायालयीन इमारतींमध्ये अग्निशमन यंत्रणा उभारणी किंवा अग्निप्रतिबंधक उपाययोजना करण्यासाठी शासनाने मंजूरी दिली आहे. यामुळे आता न्यायालयाच्या सर्व इमारतीला अग्निशन सुरक्षा मिळणार आहे. 

राज्यातील सर्व न्यायालयीन इमारतीचे फायर आॅडिट करण्यात येत असून, अग्निशमन यंत्रणा उभारणी किंवा अग्निप्रतिबंधक उपाययोजना करण्यात येत आहेत. मुंबई उच्च न्यायालय आणि जिल्हा व सत्र न्यायालय नांदेड आणि त्यांच्या नियंत्रणाखालील इमारती व  मुखेड, कंधार, भोकर, बिलोली, किनवट, हदगाव, देगलूर, लोहा, नायगाव, माहूर, उमरी, धर्माबाद, हिमायतनगर आणि अर्धापूर या ठिकाणी ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे. यासाठी सन २०१५- १६ च्या दरसूचीप्रमाणे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी पाठविलेला प्रस्ताव साक्षांकीत केला. त्यानुसार दोन कोटी ३९ लाख ८८ हजार ४३८ रुपये इतक्या खर्चाच्या कामास राज्याच्या कार्यासन अधिकारी भाग्यश्री भाईडकर यांनी गुरूवारी (ता. २६) प्रशासकिय मान्यता दिली. 

आकडे बोलतात

नांदेड- ५० लाख ५६ हजार सात, मुखेड- २१ लाख ६७ हजार ४०९, कंधार- १४ लाख ७९ हजार ९०१, भोकर- १४ लाख ४७ हजार ७८९, बिलोली- २७ लाख आठ हजार ८२५, किनवट, हदगाव आणि देगलूर प्रत्येकी- १२ लाख ६१ हजार ३६, लोहा, नायगाव आणि माहूर प्रत्येकी- १५ लाख ३१ हजार ७८९, उमरी, धर्माबाद, हिमायतनगर आणि अर्धापूर प्रत्येकी - सहा लाख ८७ हजार ५०८ असे दोन कोटी ३९ लाख ८८ हजार ४३८ रुपये

Web Title: Nanded Court will get fire brigade Protection