esakal | नांदेड : लाचप्रकरणी उपजिल्हाधिकार्यांवर गुन्हा
sakal

बोलून बातमी शोधा

money.jpg

नांदेड : लाचप्रकरणी उपजिल्हाधिकार्यांवर गुन्हा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नांदेड : अनधिकृत वाळू वाहतूक करणाऱ्या दोन टिपरला सोडण्यासाठी दोन लाखांची लाच मागून ती स्वीकारल्याप्रकरणी बिलोली उपविभागाचे उपजिल्हाधिकारी अमोलसिंह भोसले यांच्या एका खाजगी व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली.

मुख्य आरोपी अमोलसिंह भोसले व अन्य खासगी व्यक्ती फरार आहे. ही कारवाई एसीबीचे पोलिस उपाधीक्षक विजय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक प्रशांत संपते यांच्या पथकाने 31 ऑगस्ट रोजी बिलोली शहरात केली. परंतु या प्रकरणात मुख्य आरोपी फरार असल्याने पाेलिसांनी अत्यंत गोपनीयता पाळली. मात्र 1 सप्टेंबर रोजी या प्रकरणात आरोपी अमोलसिंह भोसले सह तिघांवर बिलोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

loading image
go to top