नांदेड-दिल्ली विमानसेवा सोमवारपासून सुरू

प्रल्हाद कांबळे
गुरुवार, 15 नोव्हेंबर 2018

नांदेड : मागील अनेक दिवसापासून नांदेड ते दिल्ली विमानसेवेला अखेर मुहूर्त लागला. येत्या सोमवारी (ता. 19) एअर इंडियाची ही सेवा सुरू होणार असून सचखंड भाविक व अन्य हवाई सफर करणाऱ्या प्रवाशांना चांगली संधि उपलब्ध होणार आहे. या सेवेला नांदेडकरांनी चांगला प्रतिसाद दिल्यास भविष्यात नांदेड- चंदीगड विमानसेवा सुरू करण्याचा मानस असल्याचे गजेंद्र गुट्टे यांनी ‘सकाळ' शी बोलतांना दिली.

नांदेड : मागील अनेक दिवसापासून नांदेड ते दिल्ली विमानसेवेला अखेर मुहूर्त लागला. येत्या सोमवारी (ता. 19) एअर इंडियाची ही सेवा सुरू होणार असून सचखंड भाविक व अन्य हवाई सफर करणाऱ्या प्रवाशांना चांगली संधि उपलब्ध होणार आहे. या सेवेला नांदेडकरांनी चांगला प्रतिसाद दिल्यास भविष्यात नांदेड- चंदीगड विमानसेवा सुरू करण्याचा मानस असल्याचे गजेंद्र गुट्टे यांनी ‘सकाळ' शी बोलतांना दिली.

येथील गुरूगोविंद सिंग हे विमानतळ आंतरराष्ट्रीय दर्जाचे आहे. परंतु या ठिकाणाहून सुरवातीला दिल्ली, मुंबई आणि अमृतसर अशी विमानसेवा सुरू होती. परंतु नंतरच्या काळात ही सेवा बंद झाली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उड्डाण या संकल्पनेतून नांदेड- हैद्राबाद ही ट्रुजेटची सेवा सुरू झाली. वाढता प्रतिसाद लक्षात घेता त्यांनी हे विमान पुढे मुंबईपर्यंत वाढविले. सध्या ही सेवा चांगल्या दर्जाची सुरू आहे. त्यानंतर एअर इंडियाच्या वतीने नांदेड- अमृतसर ही विमानसेवा सुरू केली. सध्या आठवड्यातून दोन दिवस म्हणजेच शनिवारी आणि रविवारी धावते. या दोन्ही विमानसेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद आहे. यासोबतच सचखंड गुरुद्वारा बोर्ड आणि खासदार अशोक चव्हाण यांनी नांदेड- दिल्ली विमानसेवा सुरू करावी अशी मागणी विमान प्राधिकरणकडे केली होती.

नांदेडला जाणाऱ्या व येणाऱ्या प्रवाशांची सेवा व्हावी व कंपनीला महसुल मिळावा म्हणून एअर इंडियाने येत्या सोमवारपासून नांदेड- दिल्ली अशी विमानसेवा सुरू करण्याचे ठरविले आहे. सोमवारी (ता. 19) पहिले विमान दिल्लीहुन नांदेडकडे झेपावणार असल्याचे गुट्टे यांनी सांगितले. नांदेड शहराला विमानसेवेने जेाडण्यात आल्याने जगाच्या कोणत्याही भागात पोहचता येते. नांदेडला लागून असलेल्या परभणी, हिंगोली, यवतमाळ, निझामाबाद या जिल्ह्यातील प्रवाशांनाही जवळ पडणार आहे. सुरू असलेल्या व नव्याने सुरू होणाऱ्या सेवेला प्रवाशांनी चांगला प्रतिसाद द्यावा असे आवाहन गजेंद्र गुट्टे आणि श्रीकांत पद्मे यांनी केले आहे. 
चौकट

एअर इंडियाचे (ए 319) हे विमान १२२ सीटचे आहे. त्यात 114 सीट इकॉनिमीक आणि आठ सिट बिझनेस क्लासच्या आहेत. नांदेड- दिल्ली हा प्रवास एक तास 45 मिनिटाचा असेल. 4256 रुपयापासून भाडे सुरू. आतापर्यंत दिल्ली जाणाऱ्या 100 प्रवाशांची बुकींग. सोमवार व गुरूवारी ही सेवा. सोमवारी (ता. 19) दुपारी 3.20 वाजता दिल्ली येथून उड्डाण तर नांदेडला 5.05 वाजता पोहचेल, परत दिल्लीकडे जाण्यासाठी 5.45 वाजता निघून 7.30 वाजत दिल्ली पोहचेल.

Web Title: nanded delhi airplane service starts from Monday