नांदेड-दिल्ली विमानसेवा आता आठवड्यातून तीन दिवस 

Air_India
Air_India

नांदेड : एअर इंडिया या नांदेड - दिल्ली सेवेला प्रवाशांचा वाढता प्रतिसाद व भाविकांची मागणी लक्षात घेता आठवड्यातून दोन दिवस ही सेवा सुरू होती. आता यात भर म्हणून 8 जूनपासून तिसरे विमान धावणार आहे. एअर इंडियाचे नांदेड स्टेशन मॅनेजर राजेंद्र गुटे यांनी ही माहिती दिली.

नांदेड येथे सचखंड गुरुद्वारा असल्याने शिखांची दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाते. सचखंडचे दर्शन घेण्यासाठी शीख बांधव देश-विदेशातून मोठ्या संख्येने नांदेडात दाखल होतात. नांदेड शहर हे विमानसेवेने जोडल्यामुळे मध्यंतरीच्या काळात प्रवाशांची संख्या कमी असल्याने बंद करण्यात आली होती. परंतु उडान योजनेअंतर्गत ही सेवा पुन्हा सुरू करण्यात आली. सध्या नांदेड हैदराबाद नांदेड मुंबई, नांदेड चंदिगड, नांदेड अमृतसर आणि नांदेड दिल्ली असे विमानसेवा सुरू आहे. यात नांदेड दिल्ली सेवा आठवड्यातून मंगळवारी आणि गुरुवारी 19 नोव्हेंबर 2018 पासून सुरू होती.

या सेवेला प्रवाशांची मागणी व प्रतिसाद लक्षात घेता पुन्हा एअर इंडियाने मे 8 जून पासून 122 आसनक्षमता असलेले विमान सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यात आठ बिझनेस क्लास तर 114 इकॉनॉमिक्स क्लास उपलब्ध आहेत. सुरुवातीचे भाडे 4309 रुपये असून प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे. ही सेवा सोमवार, गुरुवार आणि शनिवार या दिवशी सुरू राहणार आहे. दिल्ली नांदेड विमान हे दुपारी 3 वाजून वीस मिनिटाला उडान होऊन नांदेड विमानतळावर पाच वाजून पाच मिनिटाला पोहोचणार आहे. तर नांदेड येथून दिल्लीला जाण्यासाठी 05:45 ला उडान घेऊन दिल्ली येथे 07:35 ला पोहोचणार आहे. अशी माहिती एअर इंडियाचे गुट्टे यांनी सकाळला दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com