नांदेड : जिल्ह्यात सरासरी 29.97 मिलीमीटर पाऊस

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 4 ऑगस्ट 2019

मागील 24 तासांत सरासरी २९.९७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. दिवसभरात एकूण ४७९.५३ मिलीमीटर पाऊस झाला.

नांदेड : जिल्ह्यात मुसळधार पाऊस बरसत आहे. रविवारी (ता.4) सकाळी आठ वाजता पावसाने काही प्रमाणात उघडीप दिली. मागील 24 तासांत सरासरी २९.९७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. दिवसभरात एकूण ४७९.५३ मिलीमीटर पाऊस झाला. तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ३८९.४१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत ४०.४७ टक्के एवढा पाऊस झाला आहे. रविवारी नांदेड शहरासह जिल्ह्यात दुपारी तीनपर्यंत ढगाळ वातावरण हाेते. मात्र, पाऊस झाला नाही. शनिवारी सर्वाधिक पाऊस माहूर, किनवट, भाेकर, हिमायतनगर तालुक्यात झाला. जिल्ह्यातील मन्याड नदी ओलांडण्याच्या नादात शनिवारी एका तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना नायगाव तालुक्यात घडली हाेती. कयाधू, पैनगंगा नदीला शनिवारी पूर आला हाेता, तर सहस्त्रकुंड धबधबा आेसंडून वाहिल्याचे दिसून आले.

जिल्ह्यात मागील २४ तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये:

नांदेड- २८.८८, मुदखेड- २०.६७, अर्धापूर- ३१.३३, भोकर-२०, उमरी- १४.३३, कंधार- २१.३३, लोहा- २१, किनवट- ५८.५७, माहूर- ७२.७५, हदगाव- ५५.१४, हिमायतनगर- ४९.३३, देगलूर- १०.३३, बिलोली- १६.४०, धर्माबाद- २१.३३, नायगाव- १९, मुखेड- १९.१४. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Nanded district an average of 29 Point 97 millimeters of rainfall in 24 hours