नांदेडमधील धान्य घोटाळ्यात पहिले दोषारोपपत्र दाखल 

scam
scam

नांदेड  : कृष्णूर (ता. नायगाव) येथील मेगा अ‍ॅग्रो अनाज कंपनीतील  घोटाळ्यात राज्य अन्वेशन गुन्हे (सीआयडी) विभागाकडून १९ आरोपीविरूदध जवळपास दीड हजार पानांचे दोषारोपत्र नायगाव न्यायालयात मंगळवारी (ता. 6) दाखल करण्यात आले आहे. दोषारोपपत्र दाखल झाला म्हणजे तपास संपला नाही. या गुन्ह्यात अडकलेल्या उर्वरीत आरोपींचा शोध सुरू असून अटकेत असलेले आठ जण हर्सुल कारागृहात बंदीस्त आहेत. 

कृष्णूर येथील मेगा धान्य कंपनीवर तत्कालीन पोलिस अधिक्षक चंद्रकिशोर मीना यांनी आपल्या पथकामार्फत ता. १८ जूलै २०१८ रोजी कारवाई करत स्वस्त धान्याने भरलेले १० ट्रक जप्त केले होते. यावेळी ११ चालकांना अटक करून त्यांच्यासह कंपनी मालक, व्यवस्थापक, पुरवठादार यांच्यावर कुंटूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणात तत्कालीन सहाय्यक पोलिस अधिक्षक नुरूल हसन यांनी योग्य तपास करून सर्व पुरावे जमा केले. परंतु हा तपास राज्य गुन्हे अन्वेशन विभागाकडे ता. १७ आॅगस्ट २०१८ रोजी वर्ग करण्यात आला.

सीआयडीच्या पोलिस अधिक्षक लता फड, पोलिस उपाधिक्षक आय. एन. पठाण, नांदेडचे आर. एन. स्वामी, एस. आर. काटकळंबकर यांच्यासह आदी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मुख्य आरोपी अजय बाहेती, जयप्रकाश तापडीया, राजू पारसेवार, ललीत खूराणा यांना ता. १० मे आणि रत्नाकर ठाकूर, रमेश भोसले, विजय शिंदे, आणि इस्मालजी नागोराव विप्तल यांना ता. एक जून रोजी अटक केली.

हे सध्या न्यायालयीन कोठडीत हर्सुल कारागृहात आहेत. मात्र सुरवातीला अटक झालेले चालक शेख कलीम, अलीमखान रसुलखान, शेख साजीद, सय्यद रियाजअली, धोंडीराम कदम, सदाशिव भारती, सुभाष कांबळे, रियाजखान पठाण, महमद इरफान, शेख अयास आणि शेख मुजीब यांची जामीनावर सुटका झाली आहे. 

या प्रकरणात सीआयडीने ९० दिवस पूर्ण होताच दोषारोपपत्र दाखल केले. मात्र सीआपीसी १७३ (८) नुसार आणखी या प्रकरणात तपास सुरू राहणार आहे. हे या गुन्ह्यातील पहिले मुळ दोषारोपप्तर दाखल झाले.  तपासात या गुन्ह्यात महसुल विभागातील अधिकारी व कर्मचारी अडकण्याची चिन्हे न्यायालयात दाखल केलेल्या दोषारोपपत्रावरून दिसून येते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com