नांदेड जिल्ह्यामध्ये दोन शेतकरी आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 डिसेंबर 2017

नांदेड - सततची नापिकी व कर्जाबाजारीपणाला कंटाळून नांदेड जिल्ह्यात दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. एक घटना किनवट तालुक्‍यात, तर दुसरी घटना बिलोली तालुक्‍यात घडली आहे.

नांदेड - सततची नापिकी व कर्जाबाजारीपणाला कंटाळून नांदेड जिल्ह्यात दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. एक घटना किनवट तालुक्‍यात, तर दुसरी घटना बिलोली तालुक्‍यात घडली आहे.

किनवट तालुक्‍यातील लिंगी येथील शेतकरी पोचारेड्डी पोचन्ना निम्मावार (वय 60) यांची विषप्राशन करून आत्महत्या केली. गेल्या काही वर्षांपासून त्यांच्या शेतात नापिकी होत होती. यामुळे ते कर्जबाजारी झाले होते. कर्जाची परतफेड व कुटुंबाची जबाबदारी सांभाळणे या विवंचनेत ते होते. दुसऱ्या घटनेत बिलोली तालुक्‍यातील केरूर शिवारात गुरुवारी (ता. 21) सकाळी एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. रामराव लालू राठोड (वय 55) असे या शेतकऱ्याचे नाव असून, त्याने विषप्राशन करून आत्महत्या केली. त्यांनीही नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून जीवन संपविले.

Web Title: nanded marathwada news farmer suicide