महापालिकेसाठी आज नांदेडमध्ये मतदान

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 ऑक्टोबर 2017

नांदेड - येथील महापालिका निवडणुकीसाठी बुधवारी (ता. ११) मतदान होत असून यंत्रणा सज्ज झाली आहे. ८१ जागांसाठी ५७८ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. प्रभाग क्रमांक दोन- तरोडा बुद्रुकमध्ये राज्यात पहिल्यादांच प्रायोगिक तत्त्वावर ‘व्हीव्हीपॅट’चा (व्होटर व्हेरिफायबल पेपर ऑडिट ट्रेल) वापर केला जाणार आहे. या महापालिकेवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, खासदार अशोक चव्हाण यांचे वर्चस्व आहे. या वर्चस्वाला शह देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपने जोराने प्रयत्न केले आहेत. 

निवडणुकीसाठी एकूण ५५० मतदान केंद्रे असून राखीव कर्मचाऱ्यांसह एकूण तीन हजार ३६१ अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती आहे. एकूण २० प्रभागांत ८१ जागांसाठी ५७८ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

एकूण मतदार तीन लाख ९६ हजार ८७२ आहेत. साहित्यासह संबंधित अधिकारी, कर्मचारी १८९ वाहनांद्वारे संबंधित केंद्रांवर आज रवाना झाल्याची माहिती निवडणूक अधिकारी तथा आयुक्त गणेश देशमुख यांनी दिली. शासकीय तंत्रनिकेतनमध्ये गुरुवारी (ता. १२) सकाळी दहापासून मतमोजणी होईल. २० पैकी १९ प्रभागांची मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर ‘व्हीव्हीपॅट’ यंत्रणा राबविलेल्या प्रभाग क्रमांक दोनची मतमोजणी होईल. दरम्यान, मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी जनजागृती करण्यात आली असून महापालिका हद्दीत मतदानाच्या दिवशी बुधवारी सुटी देण्यात आली आहे.

Web Title: nanded marathwada news municipal election