नांदेड महापौरपदासाठी कॉंग्रेसतर्फे भवरेंचा अर्ज

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 ऑक्टोबर 2017

नांदेड - नांदेड येथील महापौरपदासाठी कॉंग्रेसतर्फे शीला किशोर भवरे, तर उपमहापौरपदासाठी विनय गिरडे पाटील यांनी आज अर्ज दाखल केले. दुसरीकडे या पदांसाठी भाजपतर्फेही अर्ज दाखल करण्यात आले आहेत. कॉंग्रेसचे स्पष्ट बहुमत असल्यामुळे दोन्ही पदांवर त्यांचेच उमेदवार विराजमान होणार हे निश्‍चित आहे. आता फक्त निवडीची औपचारिकता बाकी आहे. येत्या बुधवारी दोन्ही पदांसाठी निवडणूक होईल.

नांदेड महापालिकेच्या निवडणुकीत 81 पैकी कॉंग्रेसला 73, भाजपला सहा, शिवसेनेला एक आणि अपक्षाला एक जागा मिळाली. त्यामुळे सर्व पदे कॉंग्रेसला मिळणार, हे निश्‍चित होते. यंदाचे महापौरपद अनुसूचित जाती (एससी) महिला प्रवर्गासाठी राखीव असल्यामुळे कॉंग्रेसतर्फे कोण, याची चर्चा सुरू होती.

Web Title: nanded marathwada news nanded mayor election