नांदेड - मेगा अॅग्रो मालकांनी पोलिसांविरूध्द दंड थोपटले

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 ऑगस्ट 2018

नांदेड : कृष्णूर येथील इंडीया मेगा अॅग्रो अनाज कंपनीचे मालक अजय बाहेती यांनी पोलिस कारवाईविरूध्द उच्च न्यायालय गाठले. झालेली कारवाई रद्द करून माझा मेगा फूड पार्क सुरू ठेवावा अशी याचिका दाखल करून पोलिसांच्या कारवाईवर त्यांनी प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले आहेत. 

नांदेड : कृष्णूर येथील इंडीया मेगा अॅग्रो अनाज कंपनीचे मालक अजय बाहेती यांनी पोलिस कारवाईविरूध्द उच्च न्यायालय गाठले. झालेली कारवाई रद्द करून माझा मेगा फूड पार्क सुरू ठेवावा अशी याचिका दाखल करून पोलिसांच्या कारवाईवर त्यांनी प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले आहेत. 

पोलिस अधिक्षक चंद्रकिशोर मीना यांच्या विशेष पथकाचे शिवप्रकाश मुळे यांनी 18 जुलै रोजी मेगा फुड पार्कवर छापा टाकला. यावेळी पोलिसांनी तेथील शासकिय वितरणाचा जवळपास एक कोटी रुपयाचा गहू व तांदूळ जप्त केला होता. परंतु पोलिसांनी संबंधीत ठिकाणी कारवाई करणे अपेक्षीत असतांना त्यांनी या सर्वच फुड पार्कला शिल केले आहे. यामुळे या पार्कमध्ये जवळपास वेगवेगळे पंधरा उत्पादन तयार केले जातात. तसेच पोलिसांच्या दबावामुळे या ठिकाणी काम करणारे कामगार बेरोजगार झाले आहेत.

शासनाच्या मेग प्रोजेक्टमध्ये आंब्यापासुन ज्यूस बनविणे, सरकीवर प्रक्रिया करून पशुखाद्य बनविणे, सोयाबीनपासून तेल, हरबऱ्यापासून दाळ, बिस्कीट, बेकरी, डेरी प्रोजेक्ट यासह जवळपास पंधरा उत्पादन या ठिकाणाहून केले जातात. यासाठी जवळपास एक हजार कामगार कार्यरत आहेत. पोलिसांनी कलम ९१ प्रमाणे नोटीस देऊन कागदपत्रे जप्त करणे अपेक्षीत आहे. या कारवाईमुळे कंपनीचा कोट्यावधीचे नुकसान झाल्याचे याचिकाकर्ते अजय बाहेती यांनी आपल्या याचीकेत नमुद केले आहे. मेगा प्रोजेक्ट बंद केल्यामुळे संविधानातील व्यवसाय करण्याचा मुलभूत अधिकार हिरावून घेण्यात आला आहे. या पार्कचा परवाना निलंबन किंवा रद्द नसतांना पोलिसांची ही कारवाई अत्यंत चुकीचे असल्याचे त्यांनी म्हंटले आहे. बाहेती यांच्याकडून अॅड. सतीश तळेकर आणि अॅड. प्रज्ञा तळेकर यांनी ही याचीका दाखल केली आहे. ही कारवाई करणाऱ्या संबंधित यंत्रणेवर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. 

Web Title: nanded mega agro owner go to high court against police