नांदेड मनसे जिल्हाध्यक्ष संभाजी जाधव यांची आत्महत्या

प्रल्हाद कांबळे 
मंगळवार, 27 ऑगस्ट 2019

घटनास्थळी भाग्यनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अनिरुद्ध काकडे, पोलिस उपनिरीक्षक एम एन दळवे पोलीस नाईक श्रीरामे, हवालदार केंद्रे यांनी भेट देऊन पंचनामा केला आहे.

नांदेड : शहराच्या तरोडा नाका परिसरात राजेशनगर भागात राहणारे मनसेचे जिल्हाध्यक्ष संभाजी गोविंदराव जाधव (वय 47) यांनी आपल्या राहत्या घरी आज (मंगळवारी) पहाटेच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. ती घटना सकाळी उघडकीस आली.

घटनास्थळी भाग्यनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अनिरुद्ध काकडे, पोलिस उपनिरीक्षक एम एन दळवे पोलीस नाईक श्रीरामे, हवालदार केंद्रे यांनी भेट देऊन पंचनामा केला आहे.

या घटनेचे वृत्त समजताच शहरातून मनसेच्या कार्यकर्त्यांसह अनेकांनी स्वर्गीय जाधव यांच्या घरी गर्दी केली. होती नेमकी आत्महत्या कशामुळे केली, हे तपासात पुढे येईल असे पोलिसांनी सांगितले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded MNS district president Sambhaji Jadhav commits suicide