नांदेड- झाडांचा आधार घेऊन राहणाऱ्यांचा संसार पुन्हा उघड्यावर 

प्रल्हाद कांबळे
रविवार, 15 एप्रिल 2018

नांदेड : शहरातील मुख्य रस्त्यावर झाडांचा आधार घेऊन आपल्या कुटूंबाला सांभाळत विविध खेळणी व देखावे तयार करून विक्री करणाऱ्यांचा संसार उघड्यावर आला आहे. अगोदरच रस्त्यावर आधार घेणाऱ्या या कुटूंबावर कुऱ्हाड कोसळली. अतिक्रमण पथकाने झाडे तोडल्याने एकच संताप व्यक्त होत आहे. 

शहराच्या विविध भागातील रस्त्यावर राजस्थान, मध्यप्रदेश आणि आंध्रप्रेदश राज्यातून हस्तकला कामगार आपला उदरनिर्वाह करण्यासाठी झाडांचा आधार घेऊन वास्तव्यास आहे. या झाडांच्या फंदीला कापड बांधुन रात्रीचा आधार घेत आपला संसार थाटत असतात. मच्छरदाणीच्या जाळीत लहाण बालकांना झोपवून कसेबसे आपेल दिवस काढतात. थोड्या दिवसांनी पुन्हा ते स्थलांतर करतात. या दरम्यान आपल्या हस्तकलेने वेगवेगळी खेळणी, सोफासेट, अत्यंत बारीक क कोरीव काम केलेले विविध सामान तयार करून विक्रीसाठी रस्त्यावरच ठेवतात. घामाच्या पैशावर ते आपला संसार चालवितात.

नांदेड शहराच्या स्नेहनगर पोलिस वसाहतीसमोर असलेल्या झाडांचा आधार घेऊन हे कुटूंब राहत होते. पंरतु अचानक महापालिकेचे अतिक्रमण पथक येऊन रस्त्यावरील झाडांच्या फांद्या तोडल्या. अक्षरश: कुटूंबाना डोळे चोळतच उठावे लागले. अगोदरच रस्त्यावर बिऱ्हाड असलेल्या या गरीब कुटूंबाचे संसार पुन्हा रस्त्यावर आल्याने या कारवाईबद्दल संताप व्यक्त होत आहे.  

Web Title: nanded municipal corporation cuts tree near footpath affects family