चिनी वस्तू हटाव, देश बचाव; सोशल मिडियावर तरुणांचे आवाहन

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 जुलै 2017

बाजारपेठेतून ‘चिनी कम’ झाल्यास मोठा परिणाम

नांदेड : सीमावादामुळे भारत-चीन संबंध ताणले गेलेत. त्यामुळे चिनी वस्तूंवर बहिष्कार टाका, असे संदेश सोशल मीडियातून व्हायलर होत आहेत. त्याचा प्रचार करण्यासाठी जणू काही अभियानच राबविले जात असल्याचा भास व्हायलर झालेले संदेश बघून व वाचून होतो. अलिकडच्या काळात सोशल मीडियातून होणाऱ्या प्रचाराचा मोठा परिणाम सर्वच क्षेत्रात दिसून येत असल्याने चिनी वस्तू बहिष्काराच्या प्रचाराचाही बाजारपेठेवर परिणाम दिसून येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

देशात ७० टक्‍क्‍यांहून अधिक इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्तू, मोबाईल ॲक्‍सेसरीज्‌ची चीनमधून आयात होते. अद्यावत तंत्रज्ञान, वेगवेगळे फिचर्स आणि इतर कंपन्यांच्या तुलनेत कमी किंमत यामुळे चिनी वस्तूंना मोठी मागणी आहे. चिनी बनावटीच्या वस्तूंनी भारतीय बाजारपेठ पूर्णतः व्यापली आहे. देशभर त्यांचा ग्राहक आहे. चीनने भारतीय बाजारपेठेवर मिळविलेली ही पकड मेट्रो शहरापासून ते गावखेड्यापर्यंत घट्ट आहे. लहान मुलांची खेळणी, घर सजावटीच्या वस्तू, लायटिंगपासून ते फोन, टीव्ही, रेफ्रीजरेटर, वॉशिंग मशिन्स या क्षेत्रात चीनने भारतीय कंपन्यांवर मात केली आहे. या सर्व वस्तूंवर आता भारतीयांनी बहिष्कार टाकावा, असे अभियान सोशल मीडियावर राबविले जात आहे. ‘चिनी वस्तू हटाव, देश बचाव’, असे भावनिक आवाहनही केले जात आहे. त्याला जर प्रतिसाद मिळाला तर बाजारपेठेतील उलाढालीवर मोठा परिणाम होणार आहे.

दिवाळीत झाला होता भारतीय कंपन्यांना फायदा
गतवर्षी दिवाळीमध्ये व्यापाऱ्यांनी चिनी फटाके, लायटिंग, पणती, आकाश कंदील आणि इतर वस्तूंवर बहिष्कार टाकला होता. त्याला ग्राहकांकडून मोठा प्रतिसादही मिळाला होता. याचा फायदा भारतीय कंपन्यांना झाला; पण हा बहिष्कार पुढे कायम राहिला नाही.

ई सकाळवरील ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा:

Web Title: nanded news Chinese goods india youth social media