नांदेडमधील घरफोडीप्रकरणी तिघांना अटक

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 24 जून 2017

शहरातील विवेकनगर भागात झालेल्या घरफोडीतील सर्व तिन्ही चोरटे पोलिसांनी अटक केले आहेत. ही घटना सात दिवसांपूर्वी घडली होती. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत घरफोडी करणाऱ्या चोरट्याला मुद्देमालासह जप्त केले आहे. त्यानंतर शुक्रवारी रात्री दोघांना अटक करण्यात आली आहे.

नांदेड - शहरातील विवेकनगर भागात झालेल्या घरफोडीतील सर्व तिन्ही चोरटे पोलिसांनी अटक केले आहेत. ही घटना सात दिवसांपूर्वी घडली होती. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत घरफोडी करणाऱ्या चोरट्याला मुद्देमालासह जप्त केले आहे. त्यानंतर शुक्रवारी रात्री दोघांना अटक करण्यात आली आहे.

भाग्यनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील विवेकनगरमध्ये राहणारे दत्तात्र्य महाजन आलेवाड यांचे घर गुरूवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी फोडले होते. चोरट्यांनी घरातील तीन लाख 60 हजारांचा ऐवज लंपास केला होता. चोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांना घटनास्थळी कोणताही पुरावा मिळत नव्हते. त्यामुळे चोरट्यांचा शोध घेण्याचे काम अत्यंत किचकट व कठीण होते. पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत पवार, सुभाष आलोने, विलास कदम, वैजनाथ पाटील, सचिन गायकवाड, बालाजी सातपुते, जाकीर पठाण आणि फोले यांनी परिश्रम घेत घरफोडी करणाऱ्या चोरांचा शोध घेतला. दत्तनगर भागातून अट्टल घरफोडी करणारा संजू किशन गुडमलवार याला ताब्यात घेतले. त्याच्या घराची झडती घेतली असता विवेकनगर मधील घरफोडीत गेलेला मुद्देमाल जप्त झाला.

संजु गुडमलवार याने घरफोडी केल्याची कबुली दिली. त्याच्या सांगण्यावरून सखोजी नगर भागातील शाहरूखखान मुनीरखान पठाण आणि जान्हवी सुमीत लांडगे यांना पोलिसांनी याच प्रकरणात अटक केली. त्यांच्याकडून काही रक्कम व दोन मोबाईल जप्त केले. मुख्य चोरटा संजु गुडमलवार हा पोलिस कोठडीत आहे. तपास महिला पोलिस उपनिरिक्षक संगिता कदम करीत आहेत. या दोन चोरट्यांना न्यालयासमोर हजर केले असता त्यांनाही पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

Web Title: nanded news crime theft maharashtra news marathi news sakal news