अट्टल गुन्हेगाराचा पोलिस पथकावर हल्ला 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 जुलै 2017

नांदेड - खून, दरोडा, जबरी चोरी, ठार मारण्याचा प्रयत्न असे गंभीर गुन्हे करून जन्मठेप झालेला आणि संचित रजेवर (पॅरोल) सुटून परत कारागृहात दाखल न झालेला संतोष माधवराव धुतराज (वय 32) हा अट्टल गुन्हेगार लातूर पोलिसांच्या जाळ्यात अडकला; मात्र त्याला अटक करण्यासाठी गेलेल्या पथकावरच अगोदर त्याने तलवारीने हल्ला केला. त्याला प्रत्युत्तर देताना पोलिसांनीही त्याच्यावर गोळ्या झाडल्या. यात गंभीर जखमी झालेल्या धुतराजवर नांदेडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

नांदेडपासून जवळच असलेल्या तळणी शिवारात गुरुवारी सकाळी सातच्या सुमारास हा प्रकार घडला. नांदेडच्या प्रभातनगर भागात राहणारा धुतराज हा खूनप्रकरणी जन्मठेप भोगत होता. तो दीड वर्षापूर्वी "पॅरोल'वर सुटला होता. तो परत कारागृहात गेलाच नाही. कारागृहात असताना त्याची किल्लारी परिसरातील एका गुन्हेगाराची ओळख झाली. किल्लारी येथून एक ट्रक चोरून नेत असताना पोलिसांनी त्याला अडविले; परंतु पोलिसांच्या गाडीला धडक देऊन एका पोलिस उपनिरीक्षकास जखमी करून तो फरारी झाला होता. पोलिसांचे एक पथक धुतराज याच्या मागावर तीन दिवसांपासून नांदेडमध्ये तळ ठोकून होते. गुरुवारी सकाळी पथकाने नांदेड तालुक्‍यातील तळणी शिवारात असलेल्या त्याच्या आखाड्यावर छापा घातला. धुतराज याच्या आईने त्याला सावध करताच हातात तलवार घेऊन तो पोलिस पथकावर चालून आला.

Web Title: nanded news criminal crime Police squad