माहूर गडावर ई-बसेस चालविणार: अर्जुन खोतकर

बालाजी कोंडे
रविवार, 2 जुलै 2017

श्री रेणूकादेवी मंदीर, श्री दत्त शिखर मंदिर, श्री अनुसया माता मंदीर, सोनापीर दर्गा ह सह शहरातील व परिसरातील सर्व पर्यटन व धार्मीक स्थळांच्या विकास कामाची माहीती विभाग प्रमुखांकडून पालकमंत्री यांनी घेतली.

माहूर - महाराष्ट्रातील देवीच्या साडे तिन शक्तीपीठा पैकी एक पुर्ण पीठ असलेल्या माहूर गडाच्या सर्वांगीन विकासाकरिता राज्य शासनाने 216 कोटी रुपयाचा आराखडा तयार केला आहे त्यास मंजुरी मिळाली आहे. तिन टप्यात हि कामे होणार आहेत. पहिल्या टप्प्यातील कामे पुर्ण झाली आहेत. दुसऱ्या टप्यात 63 कोटी रूपयाची विकास कामे करण्यात येणार आहेत. शनिवारी ( ता.1) माहूर तहसिल कार्यालयात पालकमंत्री अर्जुन खोतकर यांनी माहरगड पर्यटन ची आढावा बैठक घेतली.

श्री रेणूकादेवी मंदीर, श्री दत्त शिखर मंदिर, श्री अनुसया माता मंदीर, सोनापीर दर्गा ह सह शहरातील व परिसरातील सर्व पर्यटन व धार्मीक स्थळांच्या विकास कामाची माहीती विभाग प्रमुखांकडून पालकमंत्री यांनी घेतली. पालकमंत्री अर्जुन खोतकर यांनी सांगीतले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुचनेनुसार माहूर गडावर ई- बसेस चालविण्यात येणार आहे त्याच बरोबर माहूर ते श्री रेणूकादेवी मंदीर व पुढे श्री दत्त शिखर मंदीर पर्यंत रोप- वे तयार करण्यात येणार आहे. त्याच बरोबर जेष्ठ नागरिकांना श्री रेणूकादेवीच्या पायऱ्या चढण्याकरिता त्रास होतो त्याकरिता लिफ्ट बसविण्यात येणार आहे. या वर्षी प्राधान्याने शौचालय, पाण्याची व्यवस्था, पथदिवे, जलसंवर्धन प्रकल्प राबविण्यात येणार आहे. माहूर निर्थक्षेत्राचा झपाट्याने विकास होत असल्याचे आपल्याला पहावयास मिळणार आहे या तिर्थक्षेत्राकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस .केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांचे विशेष लक्ष आहे असे पालकमंत्री अर्जुन खोतकर यांनी सांगितले.

बैठकीस आमदार प्रदिप नाईक, अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष समाधान जाधव, जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे, नगराध्यक्ष फिरोज दोसाणी, तहसिलदार सिध्देश्वर वरणगावकर ,प. स. चे सभापती मारोती रेकूलवार, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाबुराव कदम, उपवनसंरक्षक आशिष ठाकरे, सहाय्यक वनसंरक्षक डॉ. राजेंद्र नाळे, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख ज्योतीबा खराटे यांच्या सह विविध विभागांचे विभाग प्रमुख, अधिकारी, पदाधिकारी, नागरिक , संस्थानचे विश्वस्त चंद्रकांत भोपी, विश्वस्त संजय कान्नव, पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Nanded news e buses starts on mahur gad