तलावात पडून शेतकऱ्याचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 जुलै 2017

रोही पिंपळगाव तांडा येथील शेतकरी सीताराम गेमा राठोड (वय ५५) शनिवारी (ता. आठ) घरून शेतात जातो म्हणून गेले होते.

नांदेड : दोन दिवसांपासून घरातून निघून गेलेल्या एका शेतकऱ्याचा मृतदेह तलावात तरंगताना आढळून आल्याची घटना मुदखेड तालक्यातील रोही पिंपळगाव तांडा येथे सोमवारी (ता.दहा) उघडकीस आली.

रोही पिंपळगाव तांडा येथील शेतकरी सीताराम गेमा राठोड (वय ५५) शनिवारी (ता. आठ) घरून शेतात जातो म्हणून गेले होते. नंतर ते परत आलेच नाही. त्यांचा नातेवाईकांनी शोध घेतला; परंतु ते आढळून आले नाहीत. लालू आमरू राठोड हे त्यांचा शोध घेत असताना वसंतवाडी शिवारात असलेल्या एका तलावात त्यांना सीताराम राठोड यांचा मृतदेह दिसला.

या वेळी त्यांनी पोलिस पाटील धारु जाधव आणि मुदखेड पोलिसांना कळविले. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. शवविच्छेदनानंतर सीताराम राठोड यांचा मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन केला. मुदखेड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.

Web Title: nanded news farmer drowns in lake

टॅग्स