शेतकरी वडिलांच्या मृत्यूनंतर मुलाची आत्महत्या 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 जुलै 2017

मुखेड, (जि. नांदेड) - वडिलांनी घेतलेले शेतीचे कर्ज कसे फेडायचे, या विवंचनेतून शेतकऱ्याच्या मुलाने घराजवळील विद्युतवाहिनी हाती धरून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (ता. 15) मुखेड तालुक्‍यातील होकर्णा येथे घडली आहे. नागनाथ व्यंकटी लुट्टे असे या मुलाचे नाव असून, त्याचे वयोवृद्ध वडील व्यंकटी लुट्टे यांच्या निधनानंतर त्याने आत्महत्या केली. रविवारी (ता. 16) सकाळी या पिता-पुत्राच्या पार्थिवावर एकाच चितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. व्यंकटी लुट्टे यांनी पेरणीसाठी बॅंकेकडून कर्ज काढले होते; मात्र ते फेडता येत नसल्यामुळे ते मानसिक तणावात होते.

मुखेड, (जि. नांदेड) - वडिलांनी घेतलेले शेतीचे कर्ज कसे फेडायचे, या विवंचनेतून शेतकऱ्याच्या मुलाने घराजवळील विद्युतवाहिनी हाती धरून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (ता. 15) मुखेड तालुक्‍यातील होकर्णा येथे घडली आहे. नागनाथ व्यंकटी लुट्टे असे या मुलाचे नाव असून, त्याचे वयोवृद्ध वडील व्यंकटी लुट्टे यांच्या निधनानंतर त्याने आत्महत्या केली. रविवारी (ता. 16) सकाळी या पिता-पुत्राच्या पार्थिवावर एकाच चितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. व्यंकटी लुट्टे यांनी पेरणीसाठी बॅंकेकडून कर्ज काढले होते; मात्र ते फेडता येत नसल्यामुळे ते मानसिक तणावात होते. यातच त्यांना अर्धांगवायूचा आजार जडल्यामुळे ते अनेक दिवसांपासून अंथरुणावरच होते. 

तरुण शेतकऱ्याची आत्महत्या 
पालम (जि. परभणी) : सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून सादलापूर (ता. पालम) येथील शेतकरी इंद्रजित संतराम धुळगुंडे (वय 28) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांची चार एकर कोरडवाहू शेती आहे. तीन वर्षांच्या दुष्काळाशी दोन हात करीत त्यांनी शेती केली. मात्र, यंदाही पावसाने दडी मारल्याने त्यांचे पिकांचे नुकसान झाल्याने त्यांनी राहत्या घरी गळफास घेतला. 

Web Title: nanded news farmer suicide