पावसाने पाठ फिरवल्यामुळे दुबार पेरणीचे संकट...

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 जून 2017

बळीराजा झाला हवालदील , शेतकऱ्यांच्या नजरा आता आभाळाकडे.

फुलवळ (नांदेड): फुलवळसह परिसरावर पुन्हा एकदा निसर्गाची अवकृपा होत असल्याचे चित्र सर्वत्र पहायला मिळत असून, तब्बल आठ दिवसापासून पाऊस दडी मारून बसला असल्याने आता पावसाने पाठ फिरवल्यामुळे खरीपाच्या उभ्या पिकांनी माना टाकून द्यायला सुरुवात केली आहे. त्यामुळे यंदाही आपल्यावर दुबार पेरणीचे संकट येते की काय या चिंतेने बळीराजा हवालदील झाला आहे.

बळीराजा झाला हवालदील , शेतकऱ्यांच्या नजरा आता आभाळाकडे.

फुलवळ (नांदेड): फुलवळसह परिसरावर पुन्हा एकदा निसर्गाची अवकृपा होत असल्याचे चित्र सर्वत्र पहायला मिळत असून, तब्बल आठ दिवसापासून पाऊस दडी मारून बसला असल्याने आता पावसाने पाठ फिरवल्यामुळे खरीपाच्या उभ्या पिकांनी माना टाकून द्यायला सुरुवात केली आहे. त्यामुळे यंदाही आपल्यावर दुबार पेरणीचे संकट येते की काय या चिंतेने बळीराजा हवालदील झाला आहे.

गेल्या 10, 11 व 12 जुन रोजी फुलवळसह परिसरात मृगाच्या पावसाने दमदार हजेरी लावली होती. त्यामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण होते. छोटे-छोटे ओढे नाले तुडुंब भरून वाहिले होते. त्यामुळे कोरड्या पडलेल्या नदीलाही ब-यापैकी पाणी आले होते. जमिनीची तहानही भागली होती. त्यामुळे शेतकरीराजा आनंदी होऊन खरीपाच्या पेरणीसाठी जोमाने कामाला लागला. महागामोलाचे बियाणे, खतं खरेदी करण्यासाठी कृषीसेवा केंद्रावर रांगेत उभाराहुन बायोमेट्रीक पद्धतीने खरेदी ही केले आणि एकदाची काळ्या आईची ओटी भरली.

मागच्या पावसाच्या ओलीने शिवार हिरवागार झाला आणि छोटी छोटी पिक वा-याच्या झोकासोबत डौलदारपणे डोलूही लागली. हवामान खात्याच्या अंदाजानुसार यंदा चांगला पावसाळा असल्याच्या बातम्या नियमीतपणे प्रकाशित झालेल्या वाचून शेतकऱ्यांना आशा होती की यंदा आपली पेरणी साधली आणि पिक जोमात येईल आणि आपलं अठराविश्व दारिद्र्य आता नक्कीच संपेल अशी भोळी आशा होती. परंतू, या परिसरात गेली आठ दिवसापासून पावसाने पाठ फिरवल्यामुळे तग धरलेली पिकं आता चांगलच ऊन धरत असून हळूहळू माना टाकून द्यायला सुरुवात केली आहे. सध्या या भागात दिवसेंदिवस ऊन्हाचा पारा कडकच जानवत असल्यामुळे पिकांबरोबरच बळीराजा ही धीर सोडू लागला असून, पुन्हा यंदाही दुबार पेरणीचे संकट येते की काय या चिंतेने बळीराजा हवालदील झाला आहे.

■ 'ई सकाळ'वरील ताज्या बातम्या
इस्रोकडून एकावेळी तब्बल 31 उपग्रह अवकाशात प्रक्षेपित
एक लाखापर्यंत पूर्ण कर्जमाफी शक्‍य
बीडः पंचायत समितीच्या माजी सभापतीने केला गोळीबार
नीट परिक्षेत पंजाबचा नवदीप पहिला; महाराष्ट्रातून अभिषेक पहिला
रामनाथ कोंविंद यांनी भरला राष्ट्रपती निवडणुकीचा अर्ज
पानशेत, वरसगाव, टेमघर: तेवीस दिवसांत 100 मिलिमीटर पाऊस
औरंगाबाद : आळंद येथे टेम्पोची कारला धडक; 1 गंभीर
विधवांच्या आयुष्यात येतोय आशेचा किरण!
तुकाराम महाराज पालखी मार्गावर वाहतुकीचा बोजवारा
आमदार गजबेंच्या अंगरक्षकाची गोळी झाडून आत्महत्या
दारू व्यावसायिकाकडून लाच घेताना पाेलिसाला अटक
एकतर्फी प्रेमातून शिक्षकाला मारहाण

Web Title: nanded news farmer waiting for rains