यंदा बियाणे खरेदीत शेतकऱ्यांना दिलासा

Farmer
Farmer

नांदेड - खरीप हंगाम तोंडावर आला आहे. शेतकऱ्यांना आता पावसाचीच प्रतीक्षा लागली आहे. खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी कृषी विभागानेही कंबर कसली आहे. जिल्ह्यात बियाणे दाखल झाली असून, त्याच्या दरातही फारशी वाढ झालेली नाही. खासगी कंपन्यांच्या काही बियाणांमध्ये काही रुपयांनी वाढ झाली असली, तरी ‘महाबीज’ने यंदा शेतकऱ्यांना दिलासाच दिला आहे. ‘महाबीज’ने अवघ्या तीन- चार जातींच्या बियाणांचेच दर एक ते सहा रुपयांनी वाढविले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना यंदा बियाणे खरेदीत ‘कही खुशी, कही गम’चा अनुभव येणार आहे.

खरीप हंगामाची चाहूल लागताच शेतकरी मशागतीच्या तयारीला लागले आहेत. सातत्याने ढगाळ वातावरण निर्माण होत असल्याने खरीपपूर्व मशागतीला वेग आला आहे. मात्र, अद्यापही समाधानकारक वळीव पाऊस झाला नसल्याने शेतकरी अद्यापही हवालदिल दिसत आहे, तरीही हवामान वेधशाळेच्या अंदाजानुसार शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची तयारी सुरू केली आहे. त्याचबरोबर सर्व कंपन्यांची खते, बियाणांनी कृषी सेवा केंद्रे सज्ज झाली आहेत. शासनाच्या कृषी विभागानेही यंत्रणा तैनात ठेवली आहे; परंतु अद्याप वळीव पाऊस नसल्याने बियाणे खरेदीला अपेक्षित गर्दी नाही. पावसाचा अंदाज पाहूनच शेतकरी बियाणे खरेदीकडे वळतील, अशी अपेक्षा आहे.

खासगी व महाबीजच्या सर्व जातींची बियाणे व खते उपलब्ध झाली आहेत. खासगी कंपन्या व महाबीजने बहुतांश जातीच्या बियाणांचे दर जैसे थे ठेवल्याने शेतकऱ्यांना खरीप हंगाम ‘अच्छे’ जाणार आहे.

बंदी घातलेल्या वाणाचा आग्रह धरु नये - पंडित मोरे
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दर्जेदार बियाण्यांचा पुरवठा होण्यासाठी कृषी विभागाने कडक तपासणी करणे व अप्रमाणित बियाण्यांचे लॉट विकण्यास बंदी घालण्याची काळजी घेतली आहे. यामुळे शेतकऱ्यांनीदेखील बंदी घातलेल्या वाणांसाठी आग्रह धरु नये. बाजारा इतर दर्जेदार वाणाची खरेदी करावी. त्यामुळे हंगामातील अडचणी कमी होतील तसेच शेतकऱ्यांनी बियाणे व खते खरेदी करताना पक्की पावती तयार करुन घ्यावी, त्यावर विक्रेत्याची व स्वताची स्वाक्षरी करावी, तसेच जोपर्यंत शेतातील पिक येणार नाही तोपर्यंत पावती व थोडसे बियाणे जपून ठेवावे, प्रत्येक कृषी केंद्रावर एक नंबरचे स्टीकर लावण्यात आले असून बियाणांबाबत व विक्रेत्याबाबत तक्रार असल्यास संपर्क करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी पंडित मोरे यांनी दिली.

बी-बियांणांचे भाव कमी
महाबीजचे सर्व बियाणांचे भाव गेल्या वर्षी प्रमाणे आहेत. तसेच सद्या शेतकऱ्यांची गर्दी नाही, विक्रेते शेतकऱ्यांच्या प्रतिक्षेत असून अजून आठ दिवसानंतर बियाणे खरेदीसाठी मोठी गर्दी होईल. त्यामुळे सद्या बियाणांचे भाव कमी असल्यामुळे शेतकऱ्यांनी तत्काळ बियाणे खरेदी करुन घ्यावे तसेच चांगल्या प्रतीचे बियाणे खरेदी करुन घ्यावे कोणत्याही चुकीच्या बियाणांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान हाेउ नये.
विपिन कासलीवाल, बि-बियाणे विक्रेत, नांदेड

पुरेसे बियाणे उपलब्ध होणार
पिक लागणारे बियाणे बियाणे पुरवठा
खरीप ज्वारी ६९७५ क्विंटल महाबीज ५० क्विंटल खासगी १२०० क्विंटल
तुर ४३२९ क्विंटल ६२ क्विंटल ४५० क्विंटल
मुग १८३१ क्विंटल ६० क्विंटल २५० क्विंटल
उडिद ३४१२ क्विंटल ६७५ क्विंटल ८०० क्विंटल
सोयाबीन ९९०५० क्विंटल १४५०० क्विंटल १९५०० क्विंटल
कापुस आवश्‍यक १३ लाख ५० हजार पाकिटे पुरवठा ५ लाख ४५ हजार पाकिटे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com