पहिल्या उपवासाने पवित्र रमजानची आजपासून सुरवात

ramzan
ramzan

नांदेड - मुस्लिम बांधवांच्या पहिल्या उपवासाने रविवारपासून (ता. २८) पवित्र रमजान महिन्यास सुरवात झाली. काल चंद्रदर्शनानंतर रमजान उपवासाचे सत्र सुरू झाले आहे. तब्बल एक तपानंतर पुन्हा एकदा कडाक्याच्या उन्हात रमजानचे आगमन झाले हे विशेष.

इस्लाम धर्मात अनन्यसाधारण असे महत्त्व असलेल्या पवित्र रमजानचा पहिला राेजा आज सर्व भाविकांनी धरला आहे. पवित्र कुराणचे अवतरण याच महिन्यात झाल्यामुळे या महिन्यास अनन्यसाधारण असे महत्त्व प्राप्त आहे. या महिन्यातील प्रत्येक आचरण व उपासनेत एकासाठी ७० पट पुण्य या महिन्यात प्राप्त हाेते. इस्लाम धर्माच्या संपूर्ण तत्वाप्रमाणे जीवन जगण्याचे प्रशिक्षण या महिन्यात सर्वांना प्राप्त हाेते.

रमजान महिन्याच्या चंद्रदर्शनापासून ते शव्वाल महिन्याच्या चंद्रदर्शनापर्यंत मुस्लिम बांधव दरराेज दिवसभर राेजा ठेवतात. ईश्‍वराच्या आज्ञेनुसार दिवसभर अन्नपाण्याचा त्याग करतात. केवळ उपाशी राहणे हे राेजा ठरत नाही. ईश्‍वराला ते अपेक्षितही नाही. समाजातील गरीब, वंचित भूकेले लाेक आशेपाेटी जीवन जगतात. त्या भुकेल्यांची भुकाची भावना सर्वसामान्यांना कळावी व त्यांच्याविषयी दया करूणाची भावना जागावी, हा देखील राेजा ठेवण्याचा एक महत्त्वाचा उद्देश आहे.

दिवसभरातील अनिवार्य पाच नमाजाबराेबरच मध्यरात्रीनंतर एकांतात अदा केली जाणारे नमाजे तहाजूत ज्यामध्ये एकांतात ईश्‍वराची क्षमायाचना केली जाते. तसेच नमाजे इशाबराेबर हाेणारी नमाजे तरावी आदी प्रार्थना करणे ही अनिवार्य आहे. त्याशिवाय राेजाचे खरे पुण्य प्राप्त हाेत नाही. रमजान हा महिना अत्यंत पवित्र असून, या महिन्यात केले जाणारी इबादत कुराण पठण, जिक्र (जप), असत गफार (क्षमायाचना) प्रेषक महंमद (स. अ.) यांच्यावर दुरूद पठण इत्यादी अल्लाह पसंत करताे व त्यांची अनेक पटीने पुण्याई प्रदान करताे.

रमजान महिन्यात ईश्‍वर केवळ धार्मिक विधी व इबादताचे अल्लाह आदेश देत नाही तर सामाजिक बांधिलकी म्हणून गाेरगरीब, वंचित, अनाथ, प्रवासी यांच्याविषयीही दानधर्म करून पुण्य कमाविण्याचे आवाहन अल्लाहने केले आहे. ईश्‍वराची उपासनेबराेबरच सामाजिक संतुलनासाठी रमजान महिन्यात विशेषदान जकात अदा करण्याचे आदेश ईश्‍वराने पवित्र कुराणमध्ये स्पष्ट दिले आहे. प्रत्येक मुस्लिम स्त्री - पुरुषांस आपल्या हलाल कमाईमधील अशी आगावू व एक वर्षे कालावधीसाठी जमा आहे. राेख रक्कम, साेने, चांदी इत्यादींवर अडीच टक्के रक्कम गाेरगरीबात दान करणे अत्यंत अनिवार्य आहे. हे समाजातील गरीब, अनाथ, वंचित, प्रवासी आदींना देण्याचा अहकाम आहे. सर्वात प्रथम आपल्या नातेवाईकांना व इतरांना जकात दान अनिवार्य आहे. रमजान ईद व इतर आनंदापासून गाेरगरीब, अनाथ, वचित राहू नये, यासाठी ईश्‍वराने ही व्यवस्था केली आहे.

एकूण शहरात रमजान महिन्याचे स्वागत उत्साहाने करण्यात आले आहे. शहरातील जवळपास सर्वच मशिदीची साफसफाई, रंगरंगाेटी, राेषणाई करण्यात आलेली आहे. सर्व भाविकांनीही आपला व्यवसाय सांभाळून रमजान महिन्याची इबादतीची याेजना आखली आहे, तर दुसरीकडे इफ्तारसाठी लागणाऱ्या फळांची व देशी, विदेशी पेंडखजुराची आवक बाजारपेठेत सुरू झाली आहे. जून महिन्याच्या २६ तारखेपर्यंत या पवित्र रमजान महिन्याचा उत्साह रंगणार आहे. शव्वाल महिन्याच्या चंद्रदर्शनानंतर रमजान ईद व ईद ऊल - फित्र मुस्लिम बांधव साजरी करतील, अशी अपेक्षा आहे.

जवळपास दाेन - तीन दशकानंतर मे महिन्याच्या चढत्या पाऱ्यात मुस्लिम बांधव राेजा ठेवणार आहेत. जूनच्या पहिल्या आठवड्यात येणाऱ्या मान्सूनने चढत्या पाऱ्यापासून दिलासा मिळेल, अशीही अपेक्षा आहे. एकूण शहरातील मुस्लिम बांधवांमध्ये जास्तीत - जास्त पुण्याईसाठी तत्परता दिसून येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com