नांदेड जिल्ह्यात अवैध धंद्यांचा सुळसुळाट

प्रल्हाद कांबळे
बुधवार, 24 मे 2017

नांदेड जिल्ह्याचा पोलिस अधिक्षक या पदाचा पदभार चंद्र किशोर मीना यांनी घेतल्यानंतर जिल्ह्यातील सर्व अवैध धंदे बंद होतील अशी अपेक्षा नांदेडकरांना होती. परंतु या धंद्यात परत वाढ झाल्याचे पोलिसांच्या कारवायावरून दिसून येते.

नांदेड - नांदेड जिल्ह्याचा पोलिस अधिक्षक या पदाचा पदभार चंद्र किशोर मीना यांनी घेतल्यानंतर जिल्ह्यातील सर्व अवैध धंदे बंद होतील अशी अपेक्षा नांदेडकरांना होती. परंतु या धंद्यात वाढ झाल्याचे पोलिसांच्या कारवायावरून दिसून येत आहे.

नांदेड जिल्ह्याचे क्षेत्रफळ तसे मोठे असून या जिल्ह्यात पोलिस ठाणे कार्यरत आहे. तसेच हा जिल्हा तेलंगणा व कर्नाटक सीमेला लागून आहे. तसेच शहरात रेल्वेचे जाळे असल्याने देशातील महत्त्वाच्या शहरांना जोडण्यात आलेले आहे. या जिल्ह्याला दंगल व गुन्हेगारीची पार्श्वभुमी आहे. जातीय दंगली व नक्षली कारवाया तसेच संशयित अतिरेक्‍यांनाही या जिल्ह्यातून ताब्यात घेण्यात आले होते. एकंदरीत हा जिल्हा पोलिस दप्तरी "रेड स्पॉट' म्हणून परिचीत आहे. त्यातच अवैध धंदे ज्यात मटका, जुगार, देशी दारु, हातभट्टी, निळे रॉकेल काळ्या बाजारात, स्वस्त धान्याचा काळाबाजार, लॉटरी यासह आदी जोमाने सुरू आहेत. त्यातच घरफोडी, चोरी, बॅग लिफ्टींग, महिलांना व वृद्धांना लुटणे, चैन स्नॅचिंग, दरोडा, खून आणि वाळू माफीया यासारखे गंभीर गुन्हे सतत घडत असतात. यावर प्रतिबंध घालण्यासाठी कर्तव्यदक्ष पोलिस अधिकारी चंद्र किशोर मीना व अप्पर पोलिस अधिक्षक संगेश शिंदे यांच्या रूपाने मिळाले. या अधिकाऱ्यांनी पूर्वीच्या ठिकाणी केलेले काम कौतुकास्पद ठरले आहे.

या अधिकाऱ्यांनी पदभार घेऊन एक महिना उलटून गेला आहे. मात्र संपूर्ण जिल्ह्यात या धंदेवाल्यांचा सुळसुळाट झाला आहे. शहरातील मटका, जुगार हे धंदे बंद झालेच नाहीत. विशेष म्हणजे पोलिस अधिक्षक मुख्यालयी पूर्ण वेळ असतांना धंदेवाले राजरोसपणे आपले उखळ पांढरे करून घेत असल्याचे दिसून येत आहे. पोलिसांच्या कारवाईत मोठी वाढ झाल्याने हे धंदे असेच सुरू राहणारा की काय असा प्रश्न नांदेडकरांना पडला आहे. शहरातील वाहतूक व्यवस्था व अतिक्रमण आणि पोलिस खात्यांतर्गत करीत असलेले काम नक्कीच भविष्यात नांदेडकरांना वेगळी दिशा देणारे ठरणार आहे. या पार्श्‍वभूमीवर मीना यांनी अवैध धंद्यांवर कारवाई करावी, अशी मागणी नांदेडकर जनतेतून होत आहे. तसेच या तरूण व कर्तव्यदक्ष तरूण अधिकाऱ्यांकडून नांदेडकरांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. आम्हीही पोलिस प्रशासनास सहकार्य करु अशा भावना व्यक्त करण्यात येत आहेत.

ई सकाळवरील ताज्या बातम्या

महिला वाहकांस छेडछाड करीत पळविले 28 हजार रूपये

''तंटामुक्त विश्वस्त संस्थां'साठी डिजीटायझेशन ही काळाची गरज'

सियाचीन भागात जेट पाठविले: पाकचा दावा

दिव्यांगांना मिळणार आता ‘युनिक कार्ड’

"समृद्धी नाही, हा तर बरबादी महामार्ग'

 

 

 

 

 

Web Title: Nanded News - illegal business increased in district