नांदेड: लोकअदालतीत ८६७ प्रकरणे निकाली

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 जुलै 2017

तीन कोटी १० लाख ६९ हजार पाचशे सत्तर इतक्या रक्कमेबाबत विविध प्रकरणांत तडजोड झाली. त्यामध्ये दिवाणी, फौजदारी, एन. आय. अॅक्ट., मोटार वाहन अपघात, भूसंपादन व इतर, तसेच कौटुंबिक न्यायालय, कामगार न्यायालय यांच्या प्रकरणांचा व विविध बॅंकाचा तसेच विद्युत प्रकरणांच्या दाखलपुर्व प्रकरणांचा समावेश होता.

नांदेड : जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या वतीने शुक्रवारी (ता. आठ) घेण्यात आलेल्या राष्ट्रीय लोकअदालतीत ८६७ प्रकरणे निकाली काढण्यात आली. तसेच तडजोडअंती तीन कोटी १० लाख ६९ हजाराचा महसुल जमा करण्यात आला.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश सविता टी. बारणे यांचे मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व न्यायालयात शनिवारी लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. सदरील लोकअदालत यशस्वी होण्यासाठी जिल्ह्यातील सर्व न्यायाधीश, तसेच पॅनलवरील न्यायाधीश, वकिल सदस्य, न्यायालयीन व्यवस्थापक तसेच पॅनल सदस्य व सर्व विधिज्ञ यांनी जास्तीत जास्त प्रकरणे निकाली काढण्यासाठी प्रयत्न केले. प्रत्येक तालुक्यासह कौटुंबिक न्यायालय, कामगार न्यायालय, सहकार न्यायालय येथे सुध्दा त्या- त्या न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. नांदेड जिल्ह्यामध्ये एकूण ८६७ प्रकरणे सामोपचाराने निकाली निघाली.

त्याद्वारे तीन कोटी १० लाख ६९ हजार पाचशे सत्तर इतक्या रक्कमेबाबत विविध प्रकरणांत तडजोड झाली. त्यामध्ये दिवाणी, फौजदारी, एन. आय. अॅक्ट., मोटार वाहन अपघात, भूसंपादन व इतर, तसेच कौटुंबिक न्यायालय, कामगार न्यायालय यांच्या प्रकरणांचा व विविध बॅंकाचा तसेच विद्युत प्रकरणांच्या दाखलपुर्व प्रकरणांचा समावेश होता. नांदेड अभिवक्ता संघाचे अध्यक्ष अॅड. मिलिंद एकताटे, उपाध्यक्ष अॅड. जगजीवन भेदे, जिल्हा सरकारी वकिल अॅड. अमरिकसिंघ वासरीकर, न्यायालयीन व्यवस्थापक महेंद्र आवटे तसेच जिल्ह्यातील सर्व विधिज्ञ्ज आणि विविध विमा कंपनी, भूसंपादन अधिकारी, मनपा, महसुल विभाग अधिकारी, तसेच न्यायालयीन कर्मचा-यांचे मोलाचे सहकार्य लाभले. प्रमुख जिल्हा न्यायाधीश सविता बारणे आणि सचीव तथा न्यायाधिश डी. टी. वसावे यांनी लोकअदालत यशस्वी झाल्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त केले.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा -
शिवसेना गांडूळासारखी आहे: अजित पवार
सिलेंडरच्या ट्रकवर चढून मद्यपी चालकाची स्फोटाची धमकी

आजीबाईंना भेटला जिल्ह्याधिकाऱ्यांच्या रूपात श्रावण बाळ !​
भारतातील चिनी नागरिकांना चीनकडून "सावधगिरीचा इशारा'
येरवडा कारागृहात कैद्यानेच केला कैद्याचा खून​
नितेश राणेंचे आंदोलन म्हणजे केवळ फालतूपणा: विनायक राऊत​
सावंतवाडीत सापडली लाल भडक नानेटी
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आढळली पाच फूटांची मगर
कोणी न्याय देता का न्याय', वृद्ध दांपत्याची आर्त हाक​
गोंदिया: गोरेगाव तालुक्‍यातील 17 गावात महिलांना मिळणार सरपंच होण्याची संधी​
तरुणाईच्या कंडिशन्स (नवा चित्रपट : कंडिशन्स अप्लाय...अटी लागू )​
नात्यांचं भावनिक हृदयांतर (नवा  चित्रपट : हृदयांतर )​
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वर्चस्वाचा भारतीय महिलांचा पूर्ण निर्धार​
नाशिक सायकलिस्ट फाऊंडेशनचे अध्यक्ष जसपालसिंग बिरदी यांचे निधन​
शिक्षकांच्या दुर्लक्षामुळे सहा वर्षाचा विद्यार्थी शाळेतील वर्गखोलीत तीन तास बंद​

Web Title: nanded news lok adalat in nanded