विद्यार्थ्यास लुटले; रेल्वेचा टीसी पोलिसांच्या जाळ्यात

file photo
file photo

नांदेड: तेलंगणा व आंध्रप्रदेशमधील दक्षिण मध्य रेल्वेअंतर्गत काम करणारे कर्मचारी मराठवाड्यांच्या प्रवाशांना नेहमीच सापत्न वागणूक देतात. या नेहमीच्या त्रासाला प्रवाशी त्रस्त झाले असताना वाद कशाला म्हणून हा त्रास निपुटपणे सहन करतात. अशातच एका महाविद्यालयीन विद्यार्थ्यास चांगलाच फटका बसला. प्रवासात त्याचा मोबाईल व रोख रक्कम टीटी व अटेन्डटनी जबरीने काढून घेतली. या प्रकरणी लोहमार्ग पोलिस ठाण्यात त्यांच्याविरूद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. टीटीला पोलिसांनी नांदेड रेल्वेस्थानकावर अटक केली.

नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात असलेल्या चोंडी येथील ओमकार गंगाधर चोंडीकर (वय २१) हे महाविद्यालयीन विद्यार्थी अजंता एक्सप्रेसमधुन रितसर टिकीट घेऊन एक जूलै रोजी औरंगाबाद ते नांदेड असा प्रवास करीत होता. तो पाणी पीण्यासाठी पूर्णा रेल्वे स्थानकावर दुपारी अडीचच्या सुमारास उतरला. पाणी पीत असताना रेल्वे सुरू झाल्याने घाईघाई तो एसीच्या बीवन कोचमध्ये चढला. यावेळी त्या बोगीत रेल्वेचा अटेन्डन्ट व्यंकट नारायण नरसिंह व टीटी शेक रज्जाक शेख उस्मान यांनी ओमकार चोंडीकर याच्याशी वाद घातला. एवढेच नाही तर त्याच्या जवळचा १२ हजार रुपये किंमतीचा मोबाईल व नगदी २५० रूपये जबरीने काढून घेतले.नांदेड आल्यानंतर त्याला मोबाईल व पैसे दिले नाही. तो गयावया करत मुदखेड रेल्वेस्थानकावर गेला. परंतु, संबंधीत कर्मचाऱ्यांनी दरवाजा बंद करून घेतला होता. ओमकार हा घरी परत आल्यावर त्यांनी थेट रेल्वे बोर्डाकडे तक्रार केली. यावरून रेल्वे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. यातील व्यंकट नरसिंग याला अटक करून त्याच्याकडून चोरलेला मोबाईल जप्त केला. यानंतर टीटी शेख यांनाही लोहमार्ग पोलिस निरीक्षक आय. एच. आत्तार यांनी अटक केली. त्याला पोलिस उपनिरीक्षक ए. ए. ए. हाश्‍मी यांनी औरंगाबाद रेल्वे न्यायालयासमोर हजर केले आहे.

ई सकाळवरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com