नांदेडमध्ये डॉ. आंबेडकर विचार संमेलनाचे आयोजन

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 जून 2017

नांदेड - समाजाला संविधान साक्षर करणे, सांवैधानिक नैतिकतेचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा दृष्टिकोन प्रतिष्ठित करणे आणि सर्व समविचारी प्रागतिक तत्वांचा समन्वय घडवून आणणे, या उद्दिष्टपुर्तीसाठी भारतरत्न डॉ.आंबेडकर यांचा वैचारिक वारसा प्रगल्भतेने पुढे नेण्याच्या दृष्टीने रविवारी (ता.25) जून रोजी एक दिवशीय पाचवे डॉ.बाबासाहेब आबेडकर विचार संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
याबाबत अतिथी हॉटेल्समध्ये संमेलन समितीच्या वतीने शनिवारी (ता.17) पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली. हे संमेलन पारंपारिक साहित्य संमेलनापासून या संमेलनाचा उद्देश वेगळा आहे असे सांगण्यात आले.

प्रगतशील लेखक संघ, मौर्य प्रतिष्ठाण आणि दैनिक उद्याचा मराठवाडा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या संमेलनाचे मध्यवर्ती विचारसुत्र "सामाजिक न्याय' असे आहे. रविवारी (25) शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात दिवसभर चालणाऱ्या या संमेलनाचे उदघाटन सकाळी दहा वाजता ज्येष्ट सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटक यांचे सामाजिक न्यायात "एनजीओची भूमिका : भ्रम आणि वास्तव' या विषयावरील बीजभाषणाने होणार आहे. या प्रसंगी महापौर शैलजा किशोर स्वामी यांच्या प्रमुख उपस्थित राहतील आणि डॉ.श्रीपाद भालचंद्र जोशी हे संमेलनाची भूमिका विशद करतील. दुसऱ्या सत्रात दुपारी साडे बारा वाजता ज्येष्ट पत्रकार पद्मश्री कुमार केतकर यांचे राज्यघटनेतील सामाजिक न्यायाची संकल्पना या विषयावर यांचे व्याख्यान होईल.

दुपारी दीड ते अडीच पर्यंत भोजन अवकाश असून सर्व उपस्थित श्रोत्यांच्य भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. दुपारी अडीच वाजता डॉ.प्रज्ञा पवार यांचे "महिला, मुले, अल्पसंख्यांक आणि सामाजिक न्याय' या विषयावर व्याख्यान होईल. दुपारी साडे तीन वाजता "सामाजिक न्याय आणि माध्यमांची भूमिका' या विषयावर ज्येष्ट माध्यमतज्ज्ञ संपादक पत्रकार संजय आवटे यांचे व्याख्यान तर साडे चार वाजता ज्येष्ट साम्यवादी विचारवंत डॉ.भालचंद्र कांगो हे "शेतकरी, श्रमिक आणि सामाजिक न्याय' या विषयावर श्रोत्यांशी संवाद साधतील. सायंकाळी साडेपाच वाजता या संमेलनाचा समारोप होणार आहे. प्रमुख वक्ते दलित साहित्य आणि आंबेडकरी आंदोलनाचे राष्ट्रीय किर्तीचे अभ्यासक कार्यकर्ते नवी दिल्लीचे डॉ.बजरंग बिहारी तिवारी यांचे "सामाजिक न्याय और आंबेडकरवादी आंदोलन' या विषयावर समारोपीय व्याख्यान होणार आहे. समारोप सत्राच्या अध्यक्षस्थानी ठाणे येथे संपन्न झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष उत्तम कांबळे हे असतील. ज्येष्ट पत्रकार संजीव कुळकर्णी आभार व्यक्त करुन संमेलनाची सांगता करतील. या वैचारिक जागराचा नांदेडकरांनी लाभ घ्यावा असे आवाहन प्रगतशी लेखक संघ, मौर्य प्रतिष्ठाण, दैनिक उद्याचा मराठवाडा व संमेलन समन्वय समितीने केले आहे.

Web Title: nanded news maharashtra news ambedkar sammelan