नांदेडमध्ये शेतमाल रस्त्यावर टाकून शेतकऱ्यांचा संताप

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 जून 2017

नांदेड शहराच्या दिशेने दूध आणि भाजीपाला घेऊन जाणारी वाहने अडविण्यात आली आहेत. शेतकरी आपला शेतमाल रस्त्यावर टाकून संताप व्यक्त करत संपात सहभागी होत आहेत.

नांदेड : महाराष्ट्राला ऐतिहासिक शेतकऱ्यांच्या बेमुदत संपाला आजपासून सुरुवात झाली आहे. नांदेड शहराच्या दिशेने दूध आणि भाजीपाला घेऊन जाणारी वाहने अडविण्यात आली आहेत. शेतकरी आपला शेतमाल रस्त्यावर टाकून संताप व्यक्त करत संपात सहभागी होत आहेत.

नांदेड जिल्ह्यातील खडकूत येथे नांदेड-नागपूर महामार्गावर शेतकरी मोठ्या प्रमाणात एकत्र झाले आहेत. तेथून नांदेड शहराकडे जाणारा शेतमाल, दूध आणि भाजीपाला वाहने अडवून रोखण्यात येत आहे. शेतकरी आपला माल रस्त्यावर टाकून संताप व्यक्त करत आहेत. राज्यातील इतर राज्यातही शेतकऱ्यांच्या संपाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान औरंगाबाद बाजार समितीत संपावरून मारहाणीचा प्रकार समोर आला आहे. संपात सहभागी होण्याचे आवाहन करण्यासाठी औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीत गेलेल्या अन्नदाता शेतकरी संघटनेचे अध्यक्ष जयाजीराव सूर्यवंशी यांच्यासह पाच जणांना व्यापारी आणि विक्रेत्यांनी मारहाण केली.

Web Title: nanded news marathi news marathawada maharashtra farmer strike