मुंबई-नांदेड विमानसेवेला तारीख पे तारीख...

जयपाल गायकवाड
बुधवार, 14 जून 2017

हैदराबादची सेवा सुरळीत; मुंबईसाठी अजून किती प्रतीक्षा करायची ?
हैदराबाद विमानसेवेला प्रतिसाद

२७ एप्रिलपासून ट्रु जेट कंपनीने नांदेड-हैदराबाद विमानसेवेला सुरुवात केली. तसेच हैदराबाद-नांदेड विमानाचे तिकीट दर सामान्यांच्या आवक्यातले असल्यामुळे अनेकांनी हवाई सफरचा अनुभव घेतला. उन्हाळ्याच्या सुट्या असल्यामुळे विमानाचे सर्व सीट बुकिंग होत असतं, दीड महिन्यापासून या विमानसेवेला चांगला प्रतिसाद दिसत आहे.

नांदेड : उडान योजनेंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २७ एप्रिल रोजी नांदेड - हैदराबाद या विमानसेवेचे उदघाटन व्हिडिओ लिंकव्दारे सिमला येथून करण्यात आले होते. त्यानंतर नांदेड- हैदराबाद विमानसेवा सुरळीत झाली असली तरी अद्यापही मुंबई विमान सेवा सुरु झाली नाही.

ता.एक मे रोजी विमान सेवा सुरु होणार होती, ती १५ मे, २३ मे, त्यानंतर पाच जून अश्‍या तारखा सांगण्यात येत होत्या मुंबई विमानसेवेसाठी तारीख पे तारख... सुरु झाल्याने नांदेडकर आता अजून किती प्रतीक्षा करायची ? असा प्रश्‍न करु लागले आहेत.
नांदेडच्या श्री.गुरुगोविंदसिंगजी विमानतळावर ‘ट्रु जेट’ कंपनी तर्फे नांदेड- हैदराबाद आणि नांदेड- मुंबई विमानसेवा सुरु होणार होती. त्यामध्ये हैदराबाद-नांदेड विमानसेवा सुरळीत सुरु असून त्यास नांदेडकरांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र नांदेड येथून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक असल्यामुळे नांदेड-मुंबई विमानसेवेची मागणी जास्त असली तरी अद्याप या मागणीकडे प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे.

याबाबत नांदेड विमातळ व्यवस्थाप श्री.मनोज यांच्याशी संपर्क साधला असता लवकरच मुंबई-नांदेड विमानसेवा सुरु होणार असल्याचे सांगितले. तसेच ट्रु-जेट विमान कंपनीच ही सेवा देणार असून हैदराबाद-नांदेड-मुंबई अशी विमानसेवा सुरु होणार आहे. मात्र काही तांत्रिक कारणामुळे मुंबई-नांदेड विमानसेवेला उशीर झाला आहे. मुंबई-नांदेड विमानसेवा सुरु करण्यासाठी सद्या विविध पातळीवरुन काम सुरु असून जून महिन्यातच विमानसेवा सुरु होण्यासाठी ‘ट्रु जेट’ कंपनी प्रयत्न करीत असल्याचे श्री.मनोज यांनी सकाळ’शी बोलताना सांगितले.

Web Title: nanded news mumbai nanded flight service pending