नांदेड जिल्ह्यातील बालकांची सदृढ योजना कुपोषित; कुपोषणात वाढ

file photo
file photo

जिल्ह्यात ४५०८ तिव्र कमी बजणाची बालके; ६८८ एमएएम तर १७७ एसएएम बालके

नांदेड: जिल्हाभरात वजन व उंचीच्या निकषावर नव्याने केलेल्या कुपोषणाच्या सर्वेक्षणात गंभीर कुपोषण श्रेणीच्या बालकांचा आकडा साडेचार हजारांपेक्षा अधिक आढळल्याने कुपोषणात वाढ झाल्याचे चित्र निर्माण झाले.

दाेन वर्षापूर्वी बदलेल्या कुपोषण मोजणीच्या निकषानुसार बाळाची उंची व वजन या आधारावर कुपोषण निश्‍चित करण्यात येत असल्याने जिल्ह्यातील दोन लाख ७४ हजार ६६६ बालकांपैकी मध्यम कुपोषीत श्रेणीमधे १७८४२ बालके तर गंभीर कुपोषीत श्रेणीमधे ४५०८ बालके अढळून आल्याने बालकांची सदृढ योजना कुपोषीत झाल्याचे सिद्ध होत आहे.

कुपोषणाच्यसा समुळ उच्चाटनाने बालमृत्यू रोखण्यासाठी आंगणवाडीस्तरवर बालक सदृढ होवून लक्षणानुसार वेळीच कुपोषण निमुर्लनासाठी उपाय योजनाची आदेश जारी आहेत. बालकांना योग्य त्या कॅलरीज आणि प्रोटीन्स नसलेले अन्न पचनशक्ती क्षीण असणे, आणि अपचन होणे एकच जीवनसत्त्व असलेले अन्न खाणे शरीरातून ऊर्जा नष्ट होणे उलट्या, जुलाबामुळे शरीरातील अन्नाचे पचन न होणे एकाच वेळी अधिक कॅलरीज्‌ असलेले अन्न खाणे आदी कारणामुळे बालकात कुपोषणाची तिव्रता वाढते. जिल्हापरिषदेच्या महिला व बालकल्याण विभागने एप्रील महिण्यात केलेल्या सर्वक्षणानुसार जिल्ह्यातील दोन लाख ७४ हजार ६६६ बालकांपैकी दोन लाख ५५ हजार ९२३ बालकांची उंची व वजनाचे मुल्यांकण करण्यात आले. त्यानुसार साधारण श्रेणीतील बालकांची ९१.२७ टक्केवारी असली तरी तीव्रकमी वजनानुसार गंभीर कुपोषण श्रेणीतील बालकांचे प्रमाण १.७६ टक्के आहे. जिल्ह्यातील लोहा तालुक्यात सर्वाधिक ४.५७ टक्यानुसार ९०९ गंभीर कुपोषीत श्रेनीतील बालके आहेत. त्याखालोखाल कंधार तालुक्यात३.५२ टक्यानुसार ७८५ बालके गंभीर कुपोषण श्रेणीत अढळून आले आहेत. नव्या निकषानुसार ६८८ बालके णमणणम तर १७७ बालके एसएएम श्रेणीत आहेत. आंगणवाडीस्तरावर शासनाला आहाराच्या विषेश व्यवस्थेनुसार बालकांना उपचार करून कुपोषणाच्या बाहेर काढण्यासाठी मोठ्या प्रयत्नांची गरज निर्माण झाली आहे.

तालुकानिहाय तिव्र कमी वजणाची बालके टक्केवारी
किनवट-२८०-१.२३ टक्के
मुखेड-२५७-०.८० टक्के
देगलूर-१०४-०.५९ टक्के
बिलोली-१०९-०.७८ टक्के
कंधार-७८५-३.५२ टक्के
भोकर-७६-०.६७ टक्के
हदगांव-२६०-१.०५ टक्के
नांदेड-३८५-२.०० टक्के
लोहा- ९०९-४.५७ टक्के
नायगाव-१४५-०.७३ टक्के
माहूर-३८०-३.९७ टक्के
उमरी-१४७-१.५४ टक्के
मुदखेड-२८०-२.७६ टक्के
हिमायतनगर-१४९-१.३१ टक्के
धर्माबाद-१८१-३.२८ टक्के
अर्धापूर-६१-०.६८ टक्के

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com