आषाढीनिमित्त पंढरपूर यात्रेसाठी नांदेडच्या २०५ बस

शिवचरण वावळे
सोमवार, 19 जून 2017

आषाढी यात्रेतून नांदेड विभागाचे १४० लाखांचे उद्दिष्ट
 

नांदेड : पंढरपूर येथे दरवर्षी आषाढी एकादशीनिमित्त यात्रा भरते. त्यासाठी एसटी महामंडळाच्या वतीने तयारी करण्यात येत आहे. यंदा आषाढी एकादशी मंगळवारी (ता. 4 जुलै) आहे. त्यासाठी यंदा नांदेडच्या एसटी महामंडळ विभागाने २०५ बसचे नियोजन केले आहे.

आषाढी एकादशीच्या दिवशी अनेक गाड्या पंढरपूर येथेच मुक्कामी राहणार असल्याची माहिती विभागीय नियंत्रक पी. एस. नेहूल यांनी दिली. एसटी महामंडळाच्या वतीने पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांची सोय करण्यासाठी दरवर्षी विशेष उपाययोजना करण्यात येते. यंदाही अशा प्रकरची व्यवस्था करण्यात आली आहे. मागील वर्षी १५७ गाड्या सोडण्यात आल्या होत्या या गाड्यांच्या ५३७ फेऱ्यातून नांदेडच्या एसटी महामंडळास एक कोटी २९ लाखांचे उत्पन्न मिळाले होते. परंतु, यंदा २०५ बसगाड्या या यात्रेसाठी सोडण्याचे नियोजन केले असून, यंदा एक कोटी ४० लाखांचे उत्पन्न होईल, असे नियोजन नांदेडच्या एस.टी. महामंडळाकडून करण्यात आले आहे.

एसटीच्या प्रवाशात गेल्यावर्षीच्या तुलनेत बऱ्यापैकी वाढ झाली आहे. ऐन लग्नसराई आणि मे, जून हा सुट्यांचा काळ एसटी महामंडळासाठी मोठा महत्त्वाचा असतो. या काळात जास्तीत जास्त प्रवासी या ना त्या निमित्ताने प्रवास करीत असतात. त्यामुळे चालक व वाहकांनी या काळात सुट्या घेऊ नयेत म्हणून त्यांच्यासाठी किलोमीटरवर आधारित प्रोत्साहन भत्ता देण्यात येत आहे. जो जास्तीत जास्त किलोमीटर प्रवास करील त्यांना हा भत्ता देण्यात येत आहे.

आषाढी निमित्ताने पंढरपूर यात्रेसाठी २९ जूनपासून २०५ बस सोडण्यात येणार आहेत. या बस ६०० फेऱ्या करणार आहेत. त्यासाठी एक कोटी ४० लाखांचे उत्पन्न व्हावे अशी अपेक्षा आहे. पंढरपूर यात्रे दरम्यान भाविकांना त्रास होणार नाही याची खबरदारी म्हणून इतक्या बस सोडण्यात आल्या आहेत. भाविकांचा प्रवास सुखाचा आनंदाचा व्हावा हीच महामंडळाची अपेक्षा आहे. त्यासाठी सर्वांचे सहकार्य अवश्यक आहे.
-पी. एस. नेहूल (विभागीय नियंत्रक अधिकारी, नांदेड.)

आणखी ताज्या बातम्या वाचा : 
विश्वास नांगरे पाटील यांची पालखीमार्गावर सायकल वारी
बाळाचा जीव घेऊन त्या मातेवर अत्याचाराचा प्रयत्न; महिला गंभीर
मुंबईत आणखी एका अभिनेत्रीची आत्महत्या
भिडेंवर गुन्हा दाखल; पालखी मार्गात बेकायदा जमाव व घोषणाबाजी
डोंबिवलीत पालिकेच्या स्मशानभूमीत वाहतोय 'मद्याचा महापूर'
बिहारचे राज्यपाल कोविंद 'एनडीए'चे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार

Web Title: nanded news pandharpur wari ST bus public transport facility