पीकविमा योजनेत सहभागासाठी शेतकऱ्यांना शेवटचा दिवस

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 29 जुलै 2017

रविवारी ग्रामीण भागातील बँका स्वीकारणार पीक विमा

नांदेड: रब्बी हंगामात राबविण्यात येत असलेल्या पंतप्रधान पीकविमा योजनेत सहभागी होण्यासाठी रविवार सोडल्यास सोमवार हा शेवटचा दिवस शिल्लक आहे. नांदेड जिल्हा पीकविमा काढणारा राज्यातील सर्वांत आग्रेसर जिल्हा म्हणून ओळखला जातो.

रविवारी ग्रामीण भागातील बँका स्वीकारणार पीक विमा

नांदेड: रब्बी हंगामात राबविण्यात येत असलेल्या पंतप्रधान पीकविमा योजनेत सहभागी होण्यासाठी रविवार सोडल्यास सोमवार हा शेवटचा दिवस शिल्लक आहे. नांदेड जिल्हा पीकविमा काढणारा राज्यातील सर्वांत आग्रेसर जिल्हा म्हणून ओळखला जातो.

अशी आहे पिक विमा योजनेची ः
- नैसर्गिक आपत्ती, कीड-रोगामुळे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण
- कर्जदार शेतकऱ्यांना बंधनकारक असून, बिगर कर्जदार शेतकऱ्यांना एेच्छिक आहे.
- विमा संरक्षित रक्कम ही प्रत्येक पिकाच्या मंजूर मर्यादेइतकी आहे.
- योजनेअंतर्गत ७० टक्के जोखीमस्तर देय आहे.
- रब्बी पिकांसाठी शेतकऱ्यांना अन्नधान्य व गळीत धान्य पिकांकरिता फक्त १.५ टक्के किवा वास्तवदर्शी दर यापैकी जे कमी असेल तो विमा हप्ता भरावयाचा आहे.
- नगदी पिकांकरिता शेतकऱ्यांसाठी विमा हप्ता दर फक्त पाच टक्के आहे.
- पूर, गारपीट, जमीन वाहून जाणे यांसारख्या आपत्तींमुळे एकट्याच्या शेतीच्या नुकसानाचादेखील स्वतंत्र पंचनाम करून भरपाई
- उभ्या पिकांबरोबरच काढणी झालेल्या पिकांनाही संरक्षण

लागणारी कागदपत्रे ः
- अर्ज
- सातबारा उतारा, आठ अ (पीक पाहणीची नोंद असणे आवश्यक)
- तलाठी किंवा कृषी सहायकांकडील पेरणीचा दाखला

सहभागासाठी संपर्क ः
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची शाखा, राष्ट्रीयीकृत बॅंक, आपल्या गावाचे कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक, तलाठी, ग्रामसेवक आणि तालुका कृषी कार्यालय

विमा योजनेत सहभागासाठी भरावयाचा विमा हप्ता, विमा संरक्षित रक्कम ः
पीक -विमा हप्ता (रुपये) - विमा संरक्षित रक्कम (रुपये)
गहू बागायत- २१७ -३३,०००
गहू जिरायत - १९८ -३०,०००
ज्वारी बागायत - २६,००० - १७१
ज्वारी जिरायत -१५८ -२४,०००
हरभरा -१५८ - २४,०००
करडई -३३० -२२,०००
कांदा - ४९८ -६०,०००

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा:

    Web Title: nanded news pik vima and farmer