नांदेड: रेल्वेत विनातिकीट प्रवास करणाऱ्या ५९८ प्रवाशांवर कारवाई

Nanded
Nanded

नांदेड : दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागात एका दिवसात विनातिकीट धारकांकडून एक लाख ८९ हजार रुपये दंड वसूल करून ५९८ प्रवाशांवर कारवाई केली.

दक्षिण मध्य रल्वे, नांदेड विभाग विनातिकीट प्रवासाला आळा घालण्यासाठी तसेच तिकीट धारक प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी तिकीट तपासणी मोहीम हाती घेत असते. या अंतर्गतच शनिवारी (ता. आठ) तिकीट तपासणी केली. ज्यात वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक नेहा रत्नाकर, प्रदीप कुमार, अंजी नायक या वाणिज्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी भाग घेतला होता.

ही मोहीम सकाळीच चार वाजता सुरु करण्यात आली. यात नांदेड ते आदिलाबाद, औरंगाबाद, परळी अश्या विविध भागात धावणाऱ्या रेल्वे गाड्यामध्ये अचानक तपासणी मोहिम घेण्यात आली. यात बसेस, जीपचा वापर करण्यात आला. धावणाऱ्या रेल्वेमध्ये सेक्शन मध्ये अचानक धाड पडल्याने विना तिकीट प्रवाश्यांचे धाबे दणाणले. यात तब्बल ५८९ विनातिकीट प्रवाशी सापडले. तसेच अनियमित प्रवास करणे आणि परवानगी शिवाय जास्त सामान घेवून जाण्यामुळे काही प्रवाश्यांवर कार्यवाही करण्यात आली. यातही काही प्रवाश्यांनी दंड न भरल्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात आली. या विनातिकीट प्रवाश्यांकडून एका दिवसातच एक लाख ८९ हजार रुपये एवढा दंड वसूल करण्यात आल्या.

या कार्यवाहीत रेल्वे सुरक्षा अधिकारी, ३३ तिकीट तपासणीस, सहा कार्यालयीन कर्मचारी, पाच वाणिज्य निरीक्षक, तीन ट्राफिक निरीक्षक, आठ रेल्वे सुरक्षा बलाचे जवान शामिल झाले .

तसेच तपासणी दरम्यान असे लक्षात आले की, बरेच प्रवासी सीजन तिकीट घेवून आरक्षित डब्यांत बसले होते. तसेच दुधवाले जनरल तिकीट घेवून प्रवास करत होते. त्यांना अशे कळविण्यात आले कि त्यांना अशा प्रकारे प्रवास करता येणार नाही. त्यांनी एम.व्ही.एस.टी. तिकीट घेवूनच दुध घेवून प्रवास करावा. तसेच २० विनापरवाना रेल्वे गाड्यामध्ये खाद्य पदार्थ विकणाऱ्या वरही कार्यवाही करण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com