नांदेड जिल्हात पावसाचे पुनरागमन ; दुबार पेरणीचे संकट टळले

जयपाल गायकवाड
सोमवार, 17 जुलै 2017

चिंब पावसानं रानं झालं आबादानी...; शेतकऱ्यांमध्ये चैतन्याचे वातावरण

नांदेड: मृग नक्षत्रामध्ये पावसाने दमदार हजेरी लावल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पेरण्या केल्या होत्या. पिकांनी माना वर काढताच पाऊस अचानक गायब झाल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट कोसळले होते. मात्र शनिवार (ता.१५) पासून जिल्ह्यात सर्वत्र पावसाने कमीअधिक प्रमाणात हजेरी लावली. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट टळल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

मागील पंधरा दिवसापासून पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यातील शेतकरी संकटात सापडला होता. अाणखी चार ते पाच दिवसांमध्ये पाऊस पडला नसता तर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असते. यंदा कपाशी व सोयाबीनची मोठ्या प्रमाणात लागवड झाली असून पावसाने पाठ फिरवल्यामुळे अनेक भागातील पिके धोक्यात आली होती. पावसाच्या लांब विश्रांतीने पिके कोमेजली होती. सिंचनाची सोय नलेल्या शेतकऱ्यांसमोर पिकांना जगवण्याचा मोठा प्रश्‍न निर्माण झाला होता. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण दिसत होते.

मात्र शनिवारपासून कमीअधिक प्रमाणात का होईना पण पिकायोग्य पाऊस पडत असल्याने हजारो हेक्टरवरील पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांत चैतन्याचे वातावरण आहे.

जिल्ह्यातील सर्व तालुक्यामध्ये समाधानकारक पावसाच्या सरी कोसाळल्या. त्यामुळे शेतकऱ्यांवरील दुबार पेरणीचे संकट टळले आहे. ज्या शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या नाहीत अशांसाठी सध्याचे वातावरण पोषक आहे. रविवारी (ता.१६ दिवसभर ढगाळ वातावरण होते मात्र सायंकाळी मुसळधार पाऊस झाला. तर सोमवारी दुपारपासून पाऊस सुरु आहे. हा पाऊस जमिनीत मुरत असल्याने पिकांसाठी लाभदाय ठरणार आहे.

दमदार पावसाची गरज
पिकायोग्य पाऊस झाला असला तरी जिल्ह्यातील नागरिकांची तहान भाविणाऱ्या प्रकल्पांमध्ये अत्यल्प जलसाठा आहे. तसेच नदीनाल्यांना पुर न गेल्याने अजूनही विहिर, बोअरच्या पाणीपातळीत वाढ न झाल्याने शेतकऱ्यांसह नागरिकांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.

शहरातील रस्ते पाण्याखाली
रविवारी (ता.१६) झालेल्या दमदार पावसाने शहरातील अनेक भागात पाणी रस्त्यावर साचले होते. तसेच साेमवारी दिवसभर पाऊस चालु असल्यामुळे खड्यांमध्ये पाणी साचले होते. शहरातील रस्त्यांवरील खड्डे मोठी समस्या बनली असून पाणी साचल्यामुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत असून. खड्यातून वाहने जात असल्यामुळे कंबरदुखीचे प्रमाण वाढल्याच्या तक्रारी नागरिक करीत आहेत. महानगरपालिकेने शहरातील रस्त्यांवरचे खड्डे बुजवण्यासाठी उपाययोजना करावेत अशी मागणी नागरिक करीत आहेत.

ई सकाळवरील ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा:

Web Title: nanded news rain all over nanded and farmer happy