माहूर तालुक्यात चार ठिकाणी विज पडून 2 युवकांचा मृत्यू

बालाजी कोंडे
रविवार, 22 ऑक्टोबर 2017

नेर येथे तीन तरूण जखमी झाले. वझरा येथे दोन बैल ठार झाले आहेत. माहूर तालुक्यात शनिवारी दुपारी तीन ते पाच वाजेच्या दरम्यान जोरदार विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडला. दरम्यान बकऱ्या चारण्याकरिता शेतात गेलेले बादल फकीरा चव्हाण (वय 18) चंदन देवीदास राठोड (वय16) दोघेही राहणार बंजारा तांडा यांच्या अंगावर विज पडल्याने दोघेही युवक जागीच ठार झाले.

माहूर : माहूर तालुक्यात शनिवारी (ता. 21) दुपारी साडेतीन ते साडेचार दरम्यान विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडला. तालुक्यातील नेर, मुरली, वझरा, बंजारा तांडा येथे विज पडल्याची घटना घडली. यामध्ये बंजारा तांडा येथे दोन युवक ठार झाले तर मुरली येथे महिला जखमी झाली.

नेर येथे तीन तरूण जखमी झाले. वझरा येथे दोन बैल ठार झाले आहेत. माहूर तालुक्यात शनिवारी दुपारी तीन ते पाच वाजेच्या दरम्यान जोरदार विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडला. दरम्यान बकऱ्या चारण्याकरिता शेतात गेलेले बादल फकीरा चव्हाण (वय 18) चंदन देवीदास राठोड (वय16) दोघेही राहणार बंजारा तांडा यांच्या अंगावर विज पडल्याने दोघेही युवक जागीच ठार झाले. सदरील घटना बकऱ्या घरी आल्यानंतर दोघांचाही शोध घेण्यात आला. सायंकाळी साडेसहा वाजता ही घटना उघडकीस आली. 

मुरली येथे शेतात काम करणाऱ्या पुजा पुलाते (वय 20) या महिलेच्या अंगावर विज पडल्याने ती गंभीर जखमी झाली. नेर येथे शेतात काम करणारे तरुण नितेश आनंदराव गायकवाड (वय 26), अंकुश झानेश्वर गायकवाड (वय 27), गजानन माणिक गायकवाड (वय 23) यांच्या अंगावर विज पडल्याने तिघेही जखमी झाले. जखमींवर माहूर येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात येऊन नितेश गायकवाड यास यवतमाळ येथे उपचाराकरिता हलविण्यात आले. वझरा येथे प्रकाश जगदाळे यांच्या शेतात विज पडून दोन बैल ठार झाले. बंजारा तांडा येथील दोन्ही युवकाचे मृतदेह माहूर येथे आणण्यात आले. तहसिलदार सिध्देश्वर वरणगावकर, नांदेड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष समाधान जाधव, सुदर्शन नाईक यांनी रुग्णालयात भेट देवून घटनेची माहीती घेतली. तर बंजारा तांडा येथील सुरेश राठोड, मनिष राठोड, विशाल जाधव, विवेक राठोड, विनय राठोड, सुरज आडे, सुशिल जाधव यांनी मदत केली.

Web Title: Nanded news rain in Mahur