महत्वाच्या एसटी बसस्थानकावर होणार सुरक्षा रक्षक तैनात

file photo
file photo

एसटी महामंडळाचा निर्णय, प्रवाशांच्या सुरक्षेसह चोरटी वाहतूक; फेरीवाल्यांचा बंदोबस्त होणार

नांदेडः राज्य परिवहन महामंडळाच्या बसस्थानकाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महामंडळाने राज्यभरातील बसस्थानकांवर खासगी सुरक्षा नेमण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाच्या अनुषंगाने नांदेडसह राज्यभरातील अनेक बसस्थानकात खासगी सुरक्षा रक्षकांची नेमणूक केली असली तरी ती हंगामी स्वरुपाची आहे. काही ठिकाणीच पूर्णवेळ हे सुरक्षा रक्षक तैनात असतात. परंतू, एस.टी महामंडळाने पुन्हा एकदा सुरक्षा रक्षक नेमण्याचा निर्णय घेतला असून, माजी सैनिकांना प्राधान्य देण्यात येणार असल्याची माहिती आहे.

बसस्थानकातून प्रवाशांची होणारी चोरटी वाहतूक, अनधिकृत फेरीवाल्यांचा उपद्रव, अनधिकृत पार्किंग, महिला प्रवाशांच्या छेडखानीचे प्रकार या सर्व बाबींच्या पार्श्‍वभूमीवर बसस्थानकांच्या सुरक्षेचा प्रश्‍न अधून-मधून ऐरणीवर येतो. त्यामुळे या पूर्वीच महामंडळाने राज्यातील ३५ बसस्थानकांवर खासगी सुरक्षारक्षकांचे कवच पुरविण्याचा निर्णय घेतले असून, हे सुरक्षा रक्षक हंगामी स्वरुपात काम करतात. त्यामुळे बस स्थानकाच्या सुरक्षेचा प्रश्न मध्येच उद्भवतो. त्यासाठी एका खासगी कंपनीशी करारही केला आहे. यानुसार अंमलबजावणी सुरू झाली आहे.

नांदेड बसस्थानकावर दोन सुरक्षा रक्षक
महामंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार नांदेड बसस्थानकात दोन खासगी सुरक्षा रक्षकांची नेमणूक केली आहे. परंतू ते कायम स्वरुपी नाहीत. हे सुरक्षा रक्षक दिवाळी, दसरा, गणेशोत्सव, लग्न सराई तसेच गर्दीच्या वेळी बोलाऊन घेतले जातात व त्यांच्याकडून सुरक्षेचे काम करून घेतले जाते, अशी माहिती विभाग नियंत्रक नंदकुमार कोलारकर यांनी ‘सकाळ’ला दिली. ते म्हणाले की, बसस्थानकावरील संशयित व्यक्ती, वस्तूंवर लक्ष ठेवणे. त्याचप्रमाणे महिलांची छेडखानीचे प्रकार रोखणे, अनधिकृत फेरीवाले, खिसेकापू, अवैध वाहतूकदारांवर नजर ठेवून त्याची माहिती वरिष्ठांकडे देणे ही सुरक्षा रक्षकांची महत्वाची कामे असून, जिल्ह्यातील सर्व तालुक्याच्या ठिकाणी देखील सुरक्षा रक्षक आहेत. परंतू ते हंगामी स्वरुपातच आहेत.

साडेपाचशे बसची वर्दळ
नांदेडच्या मध्यवर्ती बसस्थानकात दररोज साडेपाचशेहून अधिक बस ये - जा करतात. त्याचबरोबर सातत्याने बसस्थानकात गर्दी असते. त्यामानाने स्वच्छता आणि साफसफाई नियमित होताना दिसत नाही. तसेच फेरीवाले, अनाधिकृत वाहतूक करणारे तसेच खिसेकापू आदींचा भरणा जास्त असतो. त्यामुळे त्याचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागले. त्यामुळे नांदेडच्या बसस्थानकात २४ तास सुरक्षारक्षकांची नेमणूक होणे गरजेचे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com