राज्यातील लांब पल्ल्यांच्या गाड्यांवर येणार संक्रांत

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 ऑगस्ट 2017

महामंडळाच्या निर्णयाने प्रवाशांच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्हे

कंधार (नांदेड): बहुजन हिताय-बहुजन सुखाय हे ब्रीद घेवून प्रवाशांच्या सेवेचे वृत्त घेणाऱ्या राज्य मार्ग परिवहन महामंडळाने राज्यातील ६० टक्क्यांपेक्षा कमी भारमान असणाऱ्या गाड्या बंद करण्याचा निर्णय केला आहे. या निर्णयामुळे लांब पल्ल्याच्या गाड्यांवर संक्रांत येवून प्रवाशांच्या अडचणीत प्रचंड वाढ होण्याची चिन्हे आहेत.

महामंडळाच्या वतीने जुलै महिन्यात लांब व मध्यम लांब फेऱ्यांचा आढावा घेण्यात आला. या आढाव्यात काही लांब व मध्यम लांबपल्ल्याच्या फेऱ्यांचे भारमान ६० टक्क्यांपेक्षा कमी आढळून आले. ज्या लांब गाडीचे उत्पन्न प्रतिकिलोमीटर ३० रुपयांपेक्षा कमी आहे, अशा गाड्या बंद करण्यात याव्यात, असे पत्र महाव्यवस्थापक (वाहतूक) यांनी राज्यतील सर्व आगारप्रमुखांना पाठवले आहे. यामुळे लांब पल्ल्याच्या गाड्यांना ब्रेक लागणार आहे.

राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना शासनाकडून विविध सवलती देण्यात येतात. यात ज्येष्ठ नागरिकांसाठी अर्धे तिकीट, स्वातंत्र्यसैनिकांसाठी मोफत प्रवासाची मुभा असते. एका बसमध्ये कमी-जास्त अर्धे प्रवासी सवलतीच्या दरातील असतात, अशा बसचे उत्पन्न प्रतिकिलोमीटर ३० रुपये येणे शक्यच नाही. प्रती किलाेमीटर ३० रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न येण्यासाठी सर्व सवलती रद्द कराव्या लागतील, असे होणे अशक्य आहे. झालेच तर ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग यांच्यासह शालेय विद्यार्थ्यांवर अन्याय करण्यासारखे होणार आहे.

कंधार आगारातून अकोला, अमरावती, रिसोड, व्होकर्णा (कर्नाटक), आळंदी अशा लांब पल्ल्यांच्या गाड्या धावतात. अमरावती गाडी तर गेल्या २५ ते ३० वर्षांपासून सुरू आहे. या गाड्यांमुळे प्रवाशांची मोठी सोय होते. परंतु प्रती किलोमीटर ३० रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या गाड्या बंद करण्याचा निर्णय झाल्याने राज्यासह बहुतांश नागरिक जस्तीचे पैसे मोजून एसटीला पसंती देतात. लांब पल्ल्यांच्या गाड्या बंद झाल्या तर प्रवाशांना खासगी बसेसशिवाय पर्याय राहणार नाही. महामंडळाला अच्छे दिन येण्यापूर्वीच बुरे दिन येतील, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :

Web Title: nanded news st the decision to close the st bus