हाताची नस कापून एकाची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 जून 2017

ओरिसा राज्यातील गयडा येथील मूळचा रहिवासी असलेला परंतु पोटाची खळगी भरण्यासाठी नांदेडमध्ये स्थायिक झालेला प्रताप पंजू पलाई (वय ३६) याने आत्महत्या केली

नांदेड - नशेत एकाने हाताची नस कापून आत्महत्या केल्याची घटना रेल्वेस्थानकासमोर रविवारी (ता. चार) दुपारी घडली. मयत हा ओरिसा राज्यातील कामगार आहे.

ओरिसा राज्यातील गयडा येथील मूळचा रहिवासी असलेला परंतु पोटाची खळगी भरण्यासाठी नांदेडमध्ये स्थायिक झालेला प्रताप पंजू पलाई (वय ३६) याने आत्महत्या केली. प्रताप पलाई याने नशेमध्ये शहर बसच्या बसस्थानकावर आपल्या दोन्ही हाताच्या नस कापून घेतल्या.

जखमी अवस्थेत त्याला वजिराबाद पोलिस जमादार जी. एस. शिंदे यांनी शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिस जमादार जी. एस. शिंदे यांच्या माहितीवरून वजिराबाद पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. तपास शिंदे करीत आहेत

Web Title: Nanded News: Suicide by immigrant