वर्गातही गुरूजींच्या मोबाईल गप्पा..; विद्यार्थ्य़ांकडे दुर्लक्ष

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 ऑगस्ट 2017

शिक्षण विभागाचे आदेश कागदावरच

मारतळा (नांदेड): अध्यापनात अडथळा निर्माण होत असल्याने शाळेच्या वेळेत मोबाईल बंद ठेवण्याचे शिक्षण विभागाचे आदेश असतानाही शिक्षक वर्ग वाऱ्यावर सोडून मोबाईल गप्पात रंगल्याचे चित्र दिसत असून, याकडे वरिष्ठही दुर्लक्ष करत असल्याने पालकांतून संताप व्यक्त होत आहे.

शिक्षण विभागाचे आदेश कागदावरच

मारतळा (नांदेड): अध्यापनात अडथळा निर्माण होत असल्याने शाळेच्या वेळेत मोबाईल बंद ठेवण्याचे शिक्षण विभागाचे आदेश असतानाही शिक्षक वर्ग वाऱ्यावर सोडून मोबाईल गप्पात रंगल्याचे चित्र दिसत असून, याकडे वरिष्ठही दुर्लक्ष करत असल्याने पालकांतून संताप व्यक्त होत आहे.

ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असून, वर्ग सुरू असतानाही मोबाईलची वाजणारी रिंग ही ज्ञानदानासह विद्यार्जनात अडथळा निर्माण करणारी आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसह शिक्षकांचेही लक्ष विचलित होते. त्यामुळे खेडेगावातील वाड्या, तांड्यांवरील पालकांच्या शालेय व्यवस्थापन समितीकडे तक्रारी वाढत आहेत. त्याची दखल घेत काहींनी बैठकीत ठराव घेवून वर्ग सुरू असताना शिक्षकांचा मोबाईल, मुख्याध्यापाकडे जमा करण्याचे आदेश ठरले. मात्र, मोबाईल बंदही नाही, जमाही नाही. यामुळे बंदी आदेश कागदावरच राहत असून, वरिष्ठही त्यांना पाठीशी घालत असल्याने पालकांतून नाराजी व्यक्त होत आहे.

वर्गातच रिंगचा आवाज
प्राथमिक शिक्षणाचा पाया असूनही त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष होत आहे. शिक्षक वर्गात शिकवत असताना मोबाईल खणखणताच ते रिसिव्ह करण्यासाठी धडपडतात. परिणामी, अध्यापनात अडथळा निर्माण होवून शैक्षणिक दर्जा खालावत आहे. निदान वर्गात तरी मोबाईल वापरावर बंदीच्या आदेशाचे पालन व्हावे, अशी अपेक्षा पालकांतून व्यक्त होत आहे.

शिक्षण विभागाचे दुर्लक्ष
शाळांमध्ये मोबाईल वापरावर बंदी असली तरी हा प्रकार सर्रास सुरू आहे. मात्र, कारवाई अपवादानेही झालेली नाही. परिणामी, विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा घसरत आहे. वर्ग सुरू असताना मध्येच शिक्षक बोलायला बाहेर पडतात. त्यामुळे त्यात दहा ते पंधरा मिनिटे जातात. त्यानंतर शिक्षकांची लिंक तुटते. याचा विद्यार्थ्यांवर परिणाम होत आहे. याकडे शिक्षण विभाग लक्ष देईल काय.

शाळेच्या वेळेत मोबाईल बंद ठेवण्याच्या पालकांच्या तक्रारी आहेत. हे सत्य असून, तशा सूचना संबंधित शिक्षक व मुख्याध्यापकांना दिल्या आहेत. यापुढेही वर्गावर मोबाईल गप्पा मारण्याचा अहवाल वरिष्ठांकडे पाठवू, अशी प्रतिक्रिया मारतळा केंद्रप्रमुख टी. पी. पाटील यांनी दिला, तर वर्गावर मोबाईल नेण्यास बंदीच हवी, त्यामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होत असून, वर्गातच मोबाईलवर बाेलणाऱ्या शिक्षकांवर कारवाईची मागणी पालक रमेश येडे यांनी 'सकाळ'शी बोलताना दिली.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :

Web Title: nanded news teacher mobile useing classromm in school