नांदेड जिल्ह्यात तीन कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 5 ऑगस्ट 2017

हिमायतनगर तालुक्यातील तिन्ही घटना

नांदेड: सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून हिमायतनगर तालुक्यातील तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. या घटनांमुळे तालुक्यात खळबळ उडाली असून, हिमायतनगर ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.

हिमायतनगर तालुक्यातील तिन्ही घटना

नांदेड: सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून हिमायतनगर तालुक्यातील तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. या घटनांमुळे तालुक्यात खळबळ उडाली असून, हिमायतनगर ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.

जिल्ह्यातील हिमायतनगर तालुका कोरडवाहू तालुका म्हणून ओळखला जातो. या तालुक्यात एका पाठोपाठ तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. वाईतांडा येथील सचिन सुरेश पवार (वय २१) या तरुण शेतकऱ्याने विष प्राशन केले होते, त्यानंतर त्याला नांदेडच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले असता त्याचा उपचारादरम्यान पाच जुलै रोजी मृत्यू झाला. रुग्णालयाच्या कागदपत्रांवरून हिमायतनगर ठाण्यात पोलिस नाईक एस. एस. वरपडे यांच्या माहितीवरून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. डोलारी येथील कर्जबाजारी शेतकरी नितीन संजय कदम (वय २२) या तरुण शेतकऱ्यानेही विष प्राशन करून ता. ३० जुलै रोजी आत्महत्या केली. त्याचाही मृत्यू नांदेडच्या शासकीय रुग्णालयात झाला. याच तालुक्यातील भोंडणी येथील विष्णू आंबू जाधव (वय ३२) यानेही विष प्राशन करून ता. एक ऑगस्ट रोजी आत्महत्या केली. या प्रकरणी हिमायतनगर ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. या सोबतच आकाश मारोती पवळे (वय २२) या तरुणाने विष प्राशन करून ता. ३१ जुलै रोजी आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा:

Web Title: nanded news three farmer suicide in himayat taluka