ट्रान्सफार्मर बिघडल्याने नांदेडकरांची लाहीलाही

प्रमोद चौधरी
रविवार, 28 मे 2017

रात्रीपासून नांदेडकर अंधारात

अनेक ठिकाणी झाडे पडली. विजेच्या ताराही तुटल्या. त्यामुळे जंगमवाडी सबस्टेशनमधील ट्रान्सफार्मर नादुरुस्त झाले. परिणामी शनिवारी रात्रीपासून नागरिकांना कुलर, पंख्याविना राहावे लागले. उष्म्याने अंगाची पार लाहीलाही झाली. याचा सर्वाधिक त्रास लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना झाला.

नांदेड : उन्हाच्या झळा असह्य झालेल्या नांदेडकरांना अचानक आलेल्या पवासामुळे दिलासा मिळाला खरा, पण अचानकर वादळ-वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसामुळे शहराला वीजपुरवठा करणारे ट्रान्सफार्मर नादुरुस्त झाले. परिणामी नागरिकांना रात्रभर अंधारात राहावे लागले. रविवारी (ता.२८) सायंकाळी सहा वाजेपर्यंत ट्रान्सफर दुरुस्त होणार असल्याने महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळातर्फे सांगण्यात आले.

शहरातील आयटीआय, श्रीनगर, पावडेवाडी नाका, तरोडा आदी प्रमुख भागांमध्ये जंगमवाडी येथील सबस्टेशनमधून वीजपुरवठा केला जातो. पावसाळा जवळ येत असल्यामुळे दुरुस्तीची कामे जोरात सुरु आहेत. त्यातच शनिवारी (ता.२७) रात्री आठ वाजेच्या सुमारास अचानक वादळ-वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. अनेक ठिकाणी झाडे पडली. विजेच्या ताराही तुटल्या. त्यामुळे जंगमवाडी सबस्टेशनमधील ट्रान्सफार्मर नादुरुस्त झाले. परिणामी शनिवारी रात्रीपासून नागरिकांना कुलर, पंख्याविना राहावे लागले. उष्म्याने अंगाची पार लाहीलाही झाली. याचा सर्वाधिक त्रास लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना झाला.

महावितरण कंपनीचे कर्मचारी रात्रीपासून ट्रान्सफार्मर दुरुस्तीचे काम करीत आहेत. यात यश आले नाही तर दुसऱ्या सबस्टेशनवर भार देण्यात येणार आहे. तसेच नवीन ट्रान्सफार्मरही रविवारी संध्याकाळपर्यंत येणार असल्याचे कंपनीती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सकाळशी बोलताना सांगितले. परिणामी शनीवारी रात्रीपासून वीज नसल्याने आरो प्लान्टसह विजेवर आधारीत संपूर्ण व्यवसाय ठप्प झाले आहेत. संध्याकाळी सहा वाजेतपर्यंत वीज येणार असल्याची माहिती कंपनीतील अधिकाऱ्यांनी दिली.

Web Title: nanded news transformer malfunction power cut laod shedding